पुणे

रांजणगाव सांडस सोसायटीत परिवर्तन

CD

रांजणगाव सांडस, ता. २० : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील रांजणगाव सांडस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री गणेश संतराज महाराज सहकार पॅनेलने एकूण १३ जागांपैकी १२ जागांवर विजय मिळवला; तर विरोधी श्री भैरवनाथ सहकारी पॅनेलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे श्री गणेश संतराज महाराज पॅनेलने परिवर्तन करीत सोसायटीवर वर्चस्व निर्माण केले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन पुंड यांनी जबाबदारी सांभाळली. श्री गणेश संतराज महाराज सहकार पॅनेलचे रोहिदास ऊर्फ राहुल वसंत रणदिवे, सोपान नारायण शितोळे, अमोल रामदास रणदिवे, राजाराम हरिभाऊ रणदिवे, भानुदास गजानन रणदिवे, प्रमोद विलास निंबाळकर, भाऊ बाबू रणपिसे, नंदा राजाराम रणदिवे, सुनीता हरिदास रणदिवे, संभाजी ज्ञानदेव शेलार, समिंद्रा भालचंद्र जगताप, यशवंत संजय आसवले हे उमेदवार विजयी झाले. तर, विरोधी श्री भैरवनाथ सहकारी पॅनेलचे कैलास नारायण रणपिसे हे एकमेव विजय झाले. या पॅनेलच्या चार उमेदवारांना अत्यंत कमी मताने पराभवाचा सामना करावा लागला.
श्री गणेश संतराज महाराज सहकार पॅनेलचे नेतृत्व रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शरदराव निंबाळकर यांनी केले. या सोसायटीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये अटीतटीची झाली. दोन्ही गटाने फ्लेक्सवर आमदार ॲड. अशोक पवार यांची छायाचित्रे वापरली होती. या सोसायटीसाठी १५४४ मतदारांनी आपला मताचा हक्क बजावला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT