पुणे

इंदापुरात अकरा जनावरांची सुटका

CD

इंदापूर, ता. २४ : इंदापूर शहरालगत तरंगवाडी गावच्या हद्दीत घागरगाव कारखान्याकडून पुणे-सोलापूर बाह्यवळणाकडे येणाऱ्या मार्गावर कत्तल करण्यासाठी चालवलेल्या ९ लहान वासरांसह एक रेडा व १ गावरान गाय भरून चालविलेला पिकअप टेम्पो इंदापूर पोलिसांनी पकडला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला असून, यामध्ये टेंपोसह ४ लाख १४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिस शिपाई नंदू बाळू जाधव यांनी फिर्याद दिली. सोमवारी (ता. २२) ४ वाजण्याच्या सुमारास सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून इंदापूर शहरालगत तरंगवाडी गावच्या हद्दीत घागरगाव कारखान्याकडून पुणे सोलापूर बाह्यवळणाकडे येणाऱ्या मार्गावर सापळा लावून पिकअप टेम्पोच्या (क्र. एमएच ११ एजी ४५३५) हौद्यामध्ये ११ जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने निर्दयतेने कोंबून चालक जमीर हारून कुरेशी (वय २६, रा. कुरेशी गल्ली, इंदापूर) घेऊन जाताना मिळून आला. त्यावरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये ४ लाख रुपये किमतीचा टेम्पो, ९ हजार रुपये किमतीची ९ वासरे, २ हजार रुपये किमतीचा १ रेडा व ३ हजार रुपये किमतीची एक गावरान गाय असा एकूण ४ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT