पुणे

प्रबळ इच्छा शक्तीमुळे निश्चित यश

CD

इंदापूर ता.२८ : कष्ट करण्याची तयारी आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर यश निश्चित मिळते. फक्त मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. मिळालेल्या संधीचे सोने करणे आवश्यक आहे, असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.
इंदापूर येथील शहा संस्कृतिक भवन येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग महाराष्ट्र, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्‌घाटन भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्याला आयुष्यामध्ये जे दुःख आले, अडचणी आल्या त्या आपल्या मुलांना येऊ नयेत म्हणून आई-वडील प्रयत्न करत असतात. त्यांना दुखवू नका त्यांची सेवा करा.

तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनीही उपस्थित मुलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी यांनी दहावीनंतर पुढे काय?, पत्रकार रामदास पवार यांनी स्वयंरोजगार तर डॉ.काशिनाथ सोलनकर यांनी करिअर मार्गदर्शन केले.

यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंदापूरचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलिस निरीक्षक दिलीप पवार, रामेश्वर माने, अतुल झगडे, बाळासाहेब ढवळे, प्राचार्य डी.एन.गरदडे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डी एन.गडदरे यांनी प्रास्ताविक केले.

-
03847

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT