पुणे

‘निकाल लावलेल्या’ गुरुजींची होणार नोंद

CD

सोमेश्वरनगर, ता. ७ : शिष्यवृत्तीधारक आणि निकालाचा टक्का वाढविण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीऐवजी चौथीला आणि आठवीऐवजी सातवीला घ्यावी, अशी मागणी शिक्षक आणि पालकांमधून होत आहे. याबाबत राज्यसरकारही सकारात्मक असल्याचे समजते. दरम्यान, शिष्यवृत्तीत शून्य टक्के ‘निकाल लावलेल्या’ गुरुजींच्या कामगिरीची नोंद गोपनीय अहवालात केली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि सातवीलाच होती. मात्र, २०१६ पासून पाचवी व आठवीच्या वर्गासाठी घेतली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बहुतांश शाळा चौथीपर्यंतच आहेत तर पाचवीचे वर्ग विद्यालयांना जोडलेले आहेत. चौथीपर्यंतच्या शाळांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधीच हिरावली गेली असून परिणामी शाळांचा पटही ढासळू लागला आहे. दुसरीकडे पाचवी वर्ग असलेल्या विद्यालयांकडून अपवाद वगळता शिष्यवृत्तीवर फारसा भर दिला जात नसल्याचेही निकालातून स्पष्ट होत आहे. जिल्ह्याचा विचार करता शिरूर, खेड व आंबेगाव तालुक्यात पाचवीचे वर्ग असलेल्या अनेक जिल्हा परिषद शाळा असून त्यांनी शाळांनी चकित करण्याइतपत कामगिरी केली आहे. तिथे इंग्रजी माध्यमाकडे वळलेले पालकही सरकारी शाळांकडे वळून मोठ्या प्रमाणावर पट वाढला आहे.

याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिक्षण विभागाला निर्देश दिले होते. राज्याचे शिक्षण आयुक्तही सकारात्मक होते. मात्र, अद्यापही शिक्षण विभागाकडून कुठलाही अधिकृत आदेश काढण्यात आलेला नसल्याने शिक्षक संभ्रमात आहेत.
प्राथमिक शिक्षक संघाचे नेते केशव जाधव म्हणाले, शिक्षणमंत्र्यांकडे नुकतीच चौथी आणि सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागणी केली. त्यांनी पूर्ण मान्यता दिली आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षातच चौथी व पाचवी आणि सातवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीसाठी नियमित होईल.

गुणवंत शिक्षक बाळासाहेब कानडे म्हणाले, की एक तर पाचवी आम्हाला जोडा किंवा शिष्यवृत्ती परीक्षा चौथीला आणा. शिष्यवृत्तीचे तंत्र प्राथमिक शिक्षकांना चांगले अवगत आहे.
गुणवंत शिक्षिका प्रीतम सातपुते म्हणाल्या, नाइलाजाने आम्हाला चौथीच्या मुलांना मंथनसारख्या खासगी परीक्षांना पैसे भरून बसवावे लागत आहे. चौथीला शिष्यवृत्ती आली तर गुणवत्ता सिद्ध करू.


गतवर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षा गांभीर्याने घेतली आणि चालू वर्षी निकाल चांगला लागला. भोरचा निकाल पन्नास टक्क्यांवर गेला आहे. चालू वर्षी बीटस्तरावर तज्ज्ञ लोकांकडून कार्यशाळा घेणार आहोत. शिष्यवृत्ती सराव चाचण्या वाढविणे, पालकसहभाग वाढविणे, शिक्षकांचा अधिकाधिक वेळ देणे असे टीमवर्क करत आहोत. तीस-चाळीस टक्के असलेला निकाल साठ-सत्तर टक्क्यांवर नेऊन सामूहिक गुणवत्तेचे प्रमाण वाढवणे हे उद्दिष्ट आहे. दरम्यान, शून्य टक्के निकाल प्राप्त करणाऱ्या शिक्षकांची गोपनीय अभिलेखांमध्ये नोंद केली जाणार आहे.
- संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

I.N.D.I.A Alliance Meeting Update: राहुल गांधींच्या निवासस्थानी पार पडलेल्या I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत झाले मोठे निर्णय!

Maharashtra Election Commission: निवडणुकीत घोळ झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने पाठवलं पत्र अन् म्हटलं...

UPI Down! गुग-पे, फोन-पे, पेटीएम सेवा कोलमडली, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

kapil sharma : कपिल शर्माच्या कॅनाडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार....लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी...पुढचा हल्ला मुंबईत करण्याचीही धमकी

Narali Pournima and Gauri Visarjan Holiday : राज्य सरकारने नारळीपौर्णिमा अन् ज्येष्ठगौरी विसर्जनानिमित्त स्थानिक सुट्टी केली जाहीर, मात्र...

SCROLL FOR NEXT