पुणे

आकडेवारी न देता अतिक्रमण हटविण्याचे आदेश

CD

शेटफळगढे, ता. ११ : अतिक्रमणाची अधिकृत आकडेवारी न देता जलसंधारण विभागाने इंदापूर तालुक्यातील ५३ गावांतील सरपंच, ग्रामविकास अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ठोस माहिती अभावी ही कारवाई केवळ कागदोपत्रीच राहण्याची शक्यता आहे.
मे २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे इंदापूर तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. पाहणीवेळी ओढ्या नाल्यावरील अतिक्रमणामुळे पूर आल्याचे निदर्शनास आणले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, जलसंधारण विभागाने अतिक्रमणाची अधिकृत माहिती न घेता मोघम आदेश काढून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. जलसंधारण विभागाने अतिक्रमणाची आकडेवारी गोळा न करता केवळ आदेश काढून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस नियोजन आणि समन्वयाची गरज असताना दोन्ही विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने हा प्रश्न कधी सुटणार? असा सवाल उपस्थित होत आहे .

या गावातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश
सुरवड, पिंपळे, न्हावी, गलांडवाडी नं. २. सराफवाडी, भावडी, अकोले, काझड, चाकाटी, पिटकेश्वर, दगडवाडी, घोरपडवाडी, पोंधवडी, निरगुडे, कळंब, रणगाव, लाकडी, लाखेवाडी, शिंदेवाडी, सरडेवाडी, भादलवाडी, खोरोची, म्हसोबाचीवाडी, कडबनवाडी, कचरवाडी, व्याहळी, निरवांगी, भांडगाव, बावडा, रेडणी, शेटफळगढे, रुई, कौठळी, निरनिमगाव, निंबोडी, अवसरी, बाभूळगाव, तरंगवाडी, कळस, रेडा, गांतोंडी, भाटनिमगाव, वकील वस्ती, शिरसटवाडी, बोरी, भरणेवाडी, निमसाखर, अंथुर्णे, वडापुरी, काटी, मदनवाडी, शेळगाव, निमगाव केतकी.

पूरग्रस्त गावाच्या हद्दीतील अतिक्रमणाची नेमकी व्याप्ती किती आहे, याबाबत जलसंधारण विभागाकडून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. अतिक्रमणाची अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच कारवाई केली जाईल.
- अशोक कदम, महसूल अधिकारी

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आदेश काढण्यात आले असून, पुढील कारवाई महसूल विभाग करेल. मात्र, अतिक्रमणाची आकडेवारी आमच्याकडे नाही.
- जे. आर. हेडगिरे, उपविभागीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi Speech Live Update : पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, देशाला करणार संबोधित

Independence Day 2025 : पंतप्रधान मोदींचे राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, लाल किल्ल्यावर बाराव्यांदा तिरंगा फडकवणार

Solapur Monsoon Update: साेलापुरला मुसळधार पावसाचा इशारा! 'हिप्परगा तलाव फुल्ल, प्रवाह मंदावला'; सांडव्यातून ४०० क्युसेकचा विसर्ग

Child Daycare Tip: मुलांना डे-केअरमध्ये पाठवताय? तर पालकांनी ह्या प्रकारे घ्या सुरक्षेची काळजी

वेतन अधीक्षकांचे आदेश! ‘ही’ कागदपत्रे नसलेल्या शिक्षकांचा थांबणार पगार; ऑगस्टच्या पगारबिलासोबत मुख्याध्यापकांना जोडावी लागणार सर्वांची कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत

SCROLL FOR NEXT