पुणे

तरुणांच्या धाडसामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला

CD

सुपे, ता.१ः तीनही दरोडेखोरांकडे पिस्तूल... ऐवज पळून नेताना त्यांनी केलेला गोळीबार... त्याला न घाबरणारे धाडसी तरुण...
सिनेस्टाइलने ग्रामस्थ व एका पोलिसाने दरोडेखोराला जेरबंद केले. त्यांनी पळवलेली लाखो रुपये किमतीच्या दागिन्यांची पिशवी मिळवली. सुपे (ता.बारामती) येथील तरुणांनी मोठे धाडस दाखविले. त्यांच्या या धाडसाचे सुपे व परिसरात कौतुक होत असून पुन्हा चोरी करण्याचे कोणी धाडस होणार नाही.

लोकांची वर्दळ असलेल्या बाजार तळावरील महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफी दुकानावर शुक्रवारी (ता.३१) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. तीन पिस्तुलधारी चोरट्यांनी हत्याराचा धाक दाखवून सुमारे १२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पिशवीत भरले. या वेळी दुकानात संचालिका अश्विनी सुयश जाधव व कारागीर सुशांत क्षीरसागर हे दोघेच होते. शटर उघडताच दरोडेखोरांनी गोळीबार केला. त्यांचे मागे क्षीरसागर धावले. तेवढ्यात जाधव यांनी सायरनचे बटन दाबले. त्यामुळे बाहेरील ग्रामस्थांना येथे काहीतरी घडल्याचे लक्षात आले. या गोंधळातच क्षीरसागर यांनी त्यातील एकाला पकडले. तेवढ्यात दुर्गेश जाधव, नाजिम शेख, सुयश जाधव यांनी त्याला पकडले. तेवढ्यातही त्याने गोळी झाडली ती गोळी एकाच्या मांडीला चाटून गेली.
दरम्यान, सलून दुकानात आलेले पोलिस नाईक दत्तात्रेय धुमाळ यांनी पकडण्यास मदत करून, पिस्तूल काढून घेतले. ही झटापट चालू असतानाच राजकुमार लव्हे, चंद्रशेखर जगताप, नाना तरटे या तरुणांनी मदत केली. या दरोडेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. दरोडेखोर, धाडसी तरुण, ग्रामस्थ व पोलिस धुमाळ यांचा सिनेस्टाइल थरार चालू होता. त्याच वेळी महालक्ष्मी ज्वेलर्सच्या संचालिका अश्विनी जाधव यांनी पळून नेत असलेली दागिन्यांचे पिशवी मिळवली. अशी माहिती तरुणांनी ''सकाळ''शी बोलताना दिली.
दरम्यान, ही घटना घडली त्या वेळी सुपे पोलिस चौकीचे पोलिस नाईक दत्तात्रेय धुमाळ सराफी दुकानाला लागून असलेल्या सलून दुकानात आले होते. सायरनचा व गोळीबाराचा आवाज, आरडा-ओरडा आणि उडालेला गोंधळ पाहून धुमाळ यांनी मोठ्या धाडसाने दरोडेखोराला पकडण्यासाठी धावले. त्याच्याकडील पिस्तूल ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

काही तासांच पोलिसांकडून आरोपींचा माग
अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, बारामतीचे विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळाला तत्काळ भेट देऊन पाहणी केली. सहायक पोलिस निरिक्षक सचिन काळे, पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख यांना पुढील सूचना दिल्या. पळून गेलेल्या आरोपींचा काही तासातच माग काढला. आज या घटनेतील दुसऱ्या आरोपीला अटक करून, गुन्ह्यात वापरलेली गाडी ताब्यात घेतली आहे.


अश्‍विनी जाधव यांचे प्रसंगावधान
महालक्ष्मी ज्वेलर्सच्या संचालिका अश्विनी सुयश जाधव यांच्यासमोर तीन दरोडेखोरांनी पिस्तूल रोखलेले. हालचाल केली तर गोळी घालीन अशी धमकी दरोडेखोरांनी दिली. अशा स्थितीत न घाबरता, प्रसंगावधान राखून मोठ्या धीराने त्यांनी प्रसंग हाताळला. गोळीबार करत दुकानातून बाहेर पडताना जाधव यांनी शिताफीने सायरन वाजवला. दरोडेखोरांच्या मागे धावून दागिन्यांची पिशवी हस्तगत केली. गोळीबार चालू असताना सुमारे ५ वर्षांची पुतनी बाहेर होती. तिलाही सुरक्षीत घरी आणले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT