पुणे

बेकायदा लिंकिंग विरोधात धरणे

CD

शिरूर, ता. ६ : खतविक्रीतील बेकायदेशीर लिंकींगला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला मलठण (ता.शिरूर) येथील खतदुकानदाराने अपशब्द वापरून अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.६) येथील तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारात धरणे धरले. संबंधित खतदुकानदाराचा निषेध करीत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, तालुकाध्यक्ष बापूसाहेब शिवले, भारतीय कृषक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विलास आंबेकर, डॉ. संतोष शिंदे, विजय शेलार, रावसाहेब संकपाळ, बापूराव कुरंदळे, विशाल शिंदे, रमेश झंझाड, शरद घाडगे, विशाल चांदणे, पांडुरंग कुरंदळे, विजय घावटे अनिता कदम, आदींसह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.
नीलेश वाळूंज यांनी सांगितले की, अण्णापूर येथील शेतकरी बापू रतन कुरंदळे यांनी मलठण येथील फुलसुंदर यांच्या खत दुकानातून युरिया खताची मागणी केली असता त्यांनी त्यांना इतर खते, औषधे घेण्याची सक्ती केली. याविरोधात त्यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी संपत कंठाळे यांच्याकडे तक्रार केली. यावर कंठाळे यांनी संबंधित दुकानदाराला समज दिली असावी. त्याचा राग डोक्यात धरून खत दुकानदार फुलसुंदर यांनी मोबाईलवरून कुरंदळे यांच्यासह कंठाळे यांच्याबद्दलही अपशब्द वापरत अपमानास्पद भाषा वापरली.
दरम्यान, नायब तहसीलदार प्रकाश मुसळे, पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, कृषी अधिकारी कंठाळे यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. परंतु खत दुकानदारावर कठोर कारवाईच्या मागणीवर शेतकरी ठाम होते. याबाबत पोलिस आणि कृषी अधिकारी यांच्यात कारवाईबाबत उशिरापर्यंत विचारविनीमय सुरू होता.

05434

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Gold Village: सोन्याचा पाऊस पडणारं गाव! महाराष्ट्रातील 'या सोनेरी गावाची' कहाणी तुम्ही ऐकलीये का?

Male News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! शनिवारपासून अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली पर्यटकांसाठी खुली, ऑनलाईन बुकिंग बंधनकारक

Vice President Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती पदाबाबतचा निर्णय, पंतप्रधान मोदी अन् जे.पी.नड्डा घेणार; 'NDA' बैठकीत ठराव

Latest Maharashtra News Updates: वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT