पुणे

सासवड येथे २१ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा

CD

सासवड, ता. ४ : पुरंदर तालुक्यातील आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन २१ मे रोजी पुरंदर हायस्कूल सासवड येथे सायंकाळी सहा वाजता केले आहे. संघटनेचे सामूदायिक विवाह सोहळा आयोजनाचे सलग १७वे वर्ष असून, सर्व समाजातील लोकांनी या मोफत विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक संजय ज्ञानोबा जगताप यांनी केले.
या विवाह सोहळ्यातील वधू-वरांना लग्नाचा पोशाख, जीवनावश्यक संसारोपयोगी भांडी, बूट, चप्पल व मंगळसूत्र, तसेच लग्नात येणाऱ्या सर्व व्यक्तींची भोजनाची व्यवस्था, भव्य मिरवणुक अशा प्रकारची व्यवस्था संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विवाह नोंदणी सासवड व जेजुरी येथे चालू आहे. तसेच, शासनाच्या शुभमंगल योजनेच्या नियमानुसार संबंधित जोडप्यास १० हजार रुपये दिले जातील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, उपाध्यक्ष विकास जगताप सचिव राहुल इनामके यांनी दिली.
विवाह नोंदणीसाठी संपर्क : ९८६०३३५६१९, ९७६३१२१९३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

SCROLL FOR NEXT