पुणे

सासवड गोळीबारातील फरार आरोपी गजाआड

CD

सासवड, ता. ७ : सासवड बसस्थानकासमोरील आइस्क्रीम पार्लरमध्ये १८ जुलै २०२४ ला दुपारी राहुल नामदेव टिळेकर यांच्यावर झालेल्या गोळीबारातील तीन फरार आरोपींपैकी एका आरोपीला सासवड पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री २ वाजता हांडेवाडी चौक (ता. हवेली) येथे सापळा रचून अटक केली आहे. सासवड न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी यापूर्वी प्रताप जगताप, अजय जगताप, दयानंद जगताप (सर्व रा. मांडकी, ता. पुरंदर) तसेच सूजल तमन्ना आंबेघर (रा. चंदननगरए आणि सुमीत कमलाकर वाघमारे (रा. उंड्री) यांना अटक केली होती. तसेच वाघमारे याच्याकडून गुन्हात वापरलेले दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि एक पुंगळी असा १ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
६ जानेवारी ला फरार आरोपींपैकी परशुराम ऊर्फ परमा कामन्ना माने हा छत्तीसगड येथून उंड्री येथे आल्याची माहिती सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना मिळाली. त्यांनी तातडीने डीबी पथकातील हवालदार सूरज नांगरे, लिकायतअली मुजावर आणि पोलिस नाईक गणेश पोटे यांना साध्या वेशात उंड्री येथे पाठवले. गोपनीय बातमीदाराच्या मदतीने हांडेवाडी चौकात सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली. पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT