पुणे

सासवडमधील वढणेवस्ती रस्ता खचला

CD

सासवड, ता. २० : सासवड (ता. पुरंदर) शहरातील वढणेवस्ती ते जयदीप मंगल कार्यालय हा रस्ता एका ठिकाणी खचल्याने परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, तसेच परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी ये- जा करत असतात. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे चारचाकी आणि मोठ्या वाहनांनी या मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते तानाजी सातव यांनी केले आहे.
येत्या रविवारी (ता. २३) संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवडमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येत आहे. या सोहळ्यात हजारो वारकरी या मार्गावरून ये- जा करणार असल्याने, कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी तानाजी सातव आणि परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. रस्ता खचल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठीही धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळा सुरू असल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. पालखी सोहळ्यापूर्वी या रस्त्याची तत्काळ दुरुस्तीची मागणी सातव आणि परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai IndiGo Plane: मुंबई विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणादरम्यान रनवेवर विमान घसरले अन्...; गोंधळाचे वातावरण

Kidney Donate : अंगणवाडी मदतनीस आईने दिली मुलीला किडनी; ‘ससून’मध्ये झाले प्रत्यारोपण

Latest Maharashtra News Updates : मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Ajit Pawar, Sharad Pawar ना धक्का देणार? Beed मध्ये मोठा डाव टाकण्याच्या तयारीत | Sakal K1

धक्कादायक! अभिनेत्री तेजस्वीनी पंडितच्या आईचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT