पुणे

भिवडीतील शेतकरी आर्थिक संकटात

CD

सासवड, ता. ७ : पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागात मे महिन्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे भिवडी परिसरात वाटाणा, घेवडा, पावटा यांसारख्या या भागातील शेतकऱ्यांच्या नगदी पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. फळबागांमध्येही पाणी साचल्याने बागायतदारांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर किल्ला परिसर आणि पश्चिम भागात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे वाटाणा, घेवडा, पावटा यांसारखी महत्त्वाची पिके अतिवृष्टीमुळे पूर्णपणे सडून गेली आहेत. काही शेतकऱ्यांची भातरोपे वाहून गेली आहेत, तर काहींना सततच्या पावसामुळे भात रोपे टाकताही आली नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
शेतकऱ्यांचे एवढे मोठे नुकसान होऊनही शासनाच्या महसूल, कृषी किंवा ग्रामविकास यापैकी कोणत्याही विभागाने अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही, अशी खंत मोकाशी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या अतिवृष्टीमुळे पश्चिम पुरंदरमधील शेतकरी मोठ्या अडचणीत आले असून, त्यांना शासनाच्या मदतीची तातडीने गरज असल्याचे विठ्ठल मोकाशी यांनी सांगितले आहे.

संबंधित गावांतील कृषी साहाय्यकांना पिकांच्या पाहणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नुकसानीचे अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- श्रीधर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी

05233

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Mandal : लालबाग राजा मंडळ अडचणीत! BMC नं धाडली नोटीस; 24 तासांत करावं लागणार 'हे' काम, अन्यथा होणार कारवाई

ठरलं! भारतातील 'या' शहरात होणार जागतिक बुद्धिबळ स्पर्धा...जगभरातील दिग्गजांचा सहभाग...

Ukadiche Modak Tips: पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवताय? सोप्या स्टेप्ससह जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Latest Maharashtra News Updates : पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीची मिरवणूक सकाळी 9 वाजता निघणार

Maratha Reservation: 'साताऱ्यात मराठा आंदोलनाच्‍या तयारीला वेग'; समाजबांधवांची बैठक; पोवई नाक्‍यावर घोषणाबाजी..

SCROLL FOR NEXT