पुणे

खेडकर यांचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा

CD

तळेगाव ढमढेरे, ता.१५ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील श्री भैरवनाथ देवाचा दोन दिवस उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम, कुस्त्यांचा आखाडा, बैलगाडा शर्यती व मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले. शर्यतीत १७५ बैलगाडे धावले. स्पर्धेत तसेच घाटाचा राजाचा मान रांजणगाव गणपती येथील बैलगाडा मालक गणपत विष्णू खेडकर यांना मिळाला.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व श्री भैरवनाथ उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत किसनभाऊ भुजबळ यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या उत्सवाचे हे ७१ वे वर्ष होते.
यात्रेच्या पहिल्या दिवशी उत्सवानिमित्त जीर्णोद्धार केलेल्या नवीन मंदिरात ''श्रीं''ची महापूजा व अभिषेक करण्यात आला. सकाळी हरिनामाच्या गजरात श्रींच्या छबिन्याची गावातून सवाद्य व टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते.
बैलगाडा प्रथम क्रमांक:- टकाटक मामा (कानूर मेसाई) व भंडारे (टाकळी भीमा) यांची जुगलबंदी (बक्षीस १ लाख रुपये),
दुसरा क्रमांक:- बाबूराव डांगे (सोने सांगवी) (बक्षीस ७५ हजार रुपये), तिसरा क्रमांक:- प्रकाश दरवडे (वरुडे) (बक्षीस ५१ हजार रु.),
चौथा क्रमांक:- दादा सोनवणे (वाघाळे) (बक्षीस ३१ हजार रु.).

बैलगाडा शर्यतीतील बैलगाडा मालकांना भरघोस बक्षीसांचे वाटप करण्यात आले. रात्री विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला. रात्री वसंत नांदवळकरसह रवींद्र पिंगळे यांचा लोकनाट्य तमाशा झाला.
यावेळी बाळासाहेब नरके, महेश भुजबळ, अनिल भुजबळ, रमेश भुजबळ, पोपट भुजबळ, शंकर भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब लांडे, दीपक लांडे, मच्छिंद्र भुजबळ, राकेश भुजबळ, ॲड. सुरेश भुजबळ, चंद्रकांत भुजबळ, श्री भैरवनाथ उत्सव मंडळाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

04563

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT