पुणे

धानोरे येथील शेतकऱ्यांना महाविस्तार ॲपद्वारे प्रशिक्षण

CD

तळेगाव ढमढेरे, ता. १ : धानोरे (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांना मंडल कृषी अधिकारी धनश्री चासकर व सहाय्यक कृषी अधिकारी प्रशांत दोरगे यांनी कृषी विभागाचा महाविस्तार ॲपद्वारे विविध योजनांची माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांना ॲप वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

कृषी विभागाचा महाविस्तार कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप (एआय) शेतकऱ्यांना लाभदायक ठरत आहे. तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक यांच्या मार्गदर्शनाखाली दोरगे यांनी ॲपद्वारे शेतकऱ्यांना मोबाईलवर पीक सल्ला, हवामान माहिती, कीड व रोग नियंत्रण-उपाय यांची माहिती दिली. ॲपसाठी स्थानिक शेतकरी गट, ग्रामपंचायती कृषी सेवा केंद्र व कृषी सखी यांचे सहकार्य घेतले जात आहे.

दरम्यान, महाविस्तार ॲपमुळे आम्हाला वेळेवर योग्य सल्ला मिळतो. आम्ही अधिक आत्मविश्वासाने शेती करत आहोत, असे मत प्रगतशील शेतकरी विजय माशिरे यांनी व्यक्त केले.
बदलते हवामान, बाजारभाव, यांत्रिकीकरण, योग्य वेळी पीक सल्ला, यांच्या मदतीने समृद्ध शेतकरी होण्यास मदत होणार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार आजच डाऊनलोड करून घ्यावे असे आवाहन दोरगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddhanath Temple : आटपाडीत सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील २४ किलो चांदी गायब, दुरुस्तीच्या नावाखाली धक्कादायक प्रकार

Bribery Action: साेलापुरात महावितरणचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; ऑनलाइन मंजुरीसाठी मागितले तीन हजार, जिल्ह्यात खळबळ!

कोर्टाच्या दणक्यानंतर धाबे दणाणले, शिंदेंसह अजितदादांचे पदाधिकारीही पोलिसांसमोर शरण; १३ जणांना अटक

Pune News: ४५ मिनिटांचा प्रवास आता ७ मिनिटांत! खंबाटकीच्या बोगद्याने प्रवासाला गती; जूनपासून वाहतूक सुरू होणार..

Nalasopara Crime : डोकं वरवंट्यानं ठेचलं, आईनेच १५ वर्षांच्या लेकीला संपवलं; काय घडलं?

SCROLL FOR NEXT