उरुळी कांचन, ता. १५ ः अष्टापूर (ता. हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोरच्या वतीने समाधान शिबिराचे आयोजन केले होते. सुमारे २८८५ नागरिकांनी याचा लाभ घेतला.
या शिबिरामध्ये अष्टापूर, हिंगणगाव, शिंदेवाडी, सांगवी सांडस, न्हावी सांडस, पेठ नायगाव, खामगाव टेक आणि टिळेकरवाडी या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
लाभार्थ्यांना या शिबिरात महसूल प्रशासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात याकरिता क्यूआर कोड वाचनालयाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. मागील अनेक वर्ष सांगवी सांडस या गावठाणातील रस्ता काही नागरिकांनी अडवला होता. या शिबिराच्या माध्यमातून तो रस्ता खुला करण्यात आला. नागरिकांनी शिबिरामध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नावर शिबिरानंतर लगेचच तोडगा काढू या आश्वासनानुसार तहसीलदार तृप्ती कोलते यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून शेतकऱ्यांशी तडजोडीने मार्ग काढत फळी वस्ती ते पठारे वस्ती हा रस्ता खुला केला. या शिबिराच्या माध्यमातून या भागातील २२ खातेदारांच्या ७/१२ वरील अपाक शेरा कमी केला. २७ खातेदारांच्या सातबारा उताऱ्यावर वारस नोंदी केल्या. संजय गांधी निराधार योजनेतील ५१ लाभार्थ्यांना, श्रावणबाळ योजनेतील १२ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. तुकडेबंदी विरुद्ध व्यवहाराचे इतर हक्कातील ८४ खातेदारांच्या नोंदी रद्द करून त्यांची नावे ७/१२ सदरी घेण्यात आली. तसेच ८० सातबारा दुरुस्त करून त्या ठिकाणी त्याचे वाटप करण्यात आले. १५१ उत्पन्नाचे दाखले, २२ रहिवास प्रमाणपत्रे, परिसरातील भिल्ल आणि पारधी समाजातील ९७ नागरिकांना जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले, परिसरातील २१२२ शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅग नोंदणी करून त्यांचे कार्ड वितरित करण्यात आले, १६५ शिधापत्रिकांमध्ये दुरुस्ती करण्यात आली. बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या दहा नागरिकांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले.
या शिबिरास शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत, हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, यशवंतचे चेअरमन सुभाष जगताप, कृषी अधिकारी अमित रणवरे, मंडल अधिकारी गिताश्री काळे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.