पुणे

पंचनामे करून बाधितांना मदत जाहीर करा

CD

ओतूर, ता.२८ : जुन्नर तालुक्यात रविवारी (ता. २६) झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटेने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकांचे शासनाने त्वरित पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनाव्दारे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे केली आहे.
अवकाळी पावसाने व गारपिटीने कांदा, केळी, द्राक्षे, ऊस, कोबी, फ्लॉवर व इतर पालेभाज्या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी खत औषधांच्या किमतीने बेजार झाला असून, शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला बाजारभाव नाही. नवीन लागवड झालेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे व गारपिटीचे मोठे संकट आले निर्माण झाले आहे. आता शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कांदा लावगडीची वाढलेली मजुरी, मजुरांचा वाढलेला रोज त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. यामुळे जुन्नर तालुक्यातील मंडलाधिकारी व प्रत्येक गावातील कामगार तलाठी यांना लेखी आदेश देवून त्वरित सर्व गावांचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल यासाठी कार्यवाही त्वरित करावी.

तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन देताना मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे, उपाध्यक्ष साईनाथ ढमढेरे, जुन्नर तालुका अध्यक्ष तानाजी तांबे, उपाध्यक्ष दिलीप खिल्लारी, जुन्नर शहर अध्यक्ष ॲड.नंदकुमार चौधरी, विकास मोर, महेंद्र फापाळे, रविराज चाळक, जितेंद्र बलसराफ, देवराम मनसुख, विक्रांत मनसुख, विनोद राजनकर, कुणाल लेंडे, मंगेश तांबे, मतिन इनामदार, शिवाजी कुलवडे, पंकज भाटे, सर्व पदाधिकारी व मनसैनिक यांच्या उपस्थित देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT