पुणे

दौंड तालुक्यात ४५ बिबट्यांचा मुक्त संचार

CD

अमर परदेशी, सकाळ वृत्तसेवा
वरवंड, ता. ७ ः दौंड तालुक्यात बिबट्यांच्या संख्येचा अनपेक्षित वाढता आलेख नागरिकांचा थरकाप उडविणारा आहे. तालुक्यात ऊस क्षेत्राच्या रूपात सुरक्षित दडण, पाणी, भक्ष्य यामुळे बिबट्यांची संख्या वाढत आहेत.
वनविभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार दौंड तालुक्यातील विविध भागात नर- मादीसह (बछडे सोडून) एकूण ४५ पेक्षा जास्त बिबट्यांचा अधिवास स्पष्ट होत आहे. परिणामी, भविष्यात मानव- बिबट संघर्षाचे प्रमाण अधिक वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकेकाळी पुस्तकात किंवा टीव्हीवर दिसणारे बिबटे आता आपल्या घराच्या उंबरठ्यावर दिसू लागले आहेत. पूर्वी जंगलातून तालुक्यात आलेले बिबटे हे जरा घाबरट होते. माणसाचा कलगा त्यांच्यासाठी नवखा होता. त्यामुळे लोकवस्तीत येऊन शिकार करण्याचे धाडस त्यांच्यात कमी होते. थोडा आरडा ओरडा होताच बिबट्या तत्काळ स्थलांतर होत होता. मात्र, आता परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. बिबट्यांच्या नव्या पिढीचा जन्मच आजूबाजूच्या शेतशिवारात होत असल्याने बिबट्यांचा अधिवास हा लोकवस्तीच्याच आजूबाजूला घोटमळताना दिसतो.

पुणे प्रादेशिक वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या काही तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या बेलगाम धावत आहे. बिबट्यांचे पाळीव प्राणी व मानवावरील हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दौंड तालुक्यात भीमा नदी काठचा पट्टा, सर्वत्र उसाचे क्षेत्र हे बिबट्यांसाठी वरदान ठरले आहे. त्यांची सदस्य संख्या वाढत चालली आहे. दौंड तालुक्यात जवळ सुमारे ४५ ते ५० च्या घरात बिबट्यांची संख्या झाली आहे. तसेच बछड्यांची संख्या वेगळीच आहे.

दौंड तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अतर्गंत दौंड, वरवंड, यवत ही तीन वनपरिमंडल कार्यालये आहेत.
सध्या यवत वनपरिमंडल कार्यालयाच्या अंतर्गत वाळकी, पानवली, लेंडेवाडी, टाकळी भीमा, कोरेगाव भीवर, वडगाव बांडे, पाटेठाण, राहू, टेळेवाडी, डुबेवाडी, पिलाणवाडी, मेमाणवाडी, देलवडी, दहिटणे, मिरवडी, पिंपळगाव, देलवडी, एकेरीवाडी, पारगाव, गलांडवाडी, गांडाळवाडी, खुटबाब, उंडवडी, लडकतवाडी, नाथाचीवाडी, खामगाव, नांदूर, कामठवाडी आदी भागात तब्बल नर मादीसह तब्बल ३० पेक्षा जास्त बिबट्यांचा संचार दिसत आहे.

तसेच, वरवंड वनपरिमंडल कार्यालयाच्या अंतर्गत वरवंड, कडेठाण, हातवळण, नानगाव, कानगाव, पाटस, तामखडा, दापोडी, केडगाव, देऊळगाव गाडा, गारफाटा आदी भागात बिबट्यांचे दर्शन घडले आहे. या भागांमध्ये एकूण १० पेक्षा जास्त बिबटे आढळून आले. तसेच, दौंड वनपरिमंडल कार्यालयाच्या अंतर्गत नानवीज, सोनवडी, स्वामी चिंचोली, मलठण, शिरापूर, बोरीबेल, रावणगाव आदी भागात एकूण पाच पेक्षा जास्त बिबट्यांचा अधिवास आढळला. मागील वर्षी बोरीपार्धी भागात बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुरांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. काही गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरात घराच्या किंवा जनावरांच्या गोठ्याशेजारी बिबट्या मुक्त संचार दिसत आहे. बिबट्यांची वाढती संख्या शेतकरी व नागरिकांसाठी पुरती डोकेदुखी बनली.

तालुक्यात बिबटे व बछड्यांची संख्या वाढत आहे. नागरिकांच्या व पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. नागरिकांनी देखील सतर्क राहावे.
- राहुल काळे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT