पुणे

संगणक परिचारकांचे मानधन रखडले

CD

वडगाव निंबाळकर, ता. ८ ः ग्रामपंचायत कार्यालयातून शासकीय माहिती भरण्याबरोबरच गावकऱ्यांना दाखले उतारे देण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या गाव पातळीवरील संगणक परिचारकांचे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक संगणक परिचारक कार्यरत आहे. कॉमन सर्विस सेंटर CSC गव्हर्नर सर्विस इंडिया लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीमधील संगणक परिचारक कार्यरत आहे. सुरुवातीपासून तुटपुंज्या पद्धतीने मिळणारे मानधनही आता वेळेवर मिळत नसल्यामुळे परिचारिकांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. बहुतांशी ग्रामपंचायतींचा कारभार ऑनलाईन पद्धतीने होत आहे. गावातील विविध विकास कामांची माहिती ऑनलाईन भरणे, ग्रामपंचायत कार्यालयातील एक ते ३३ प्रकारचे ऑनलाइन दाखले तयार करणे, शासन पातळीवरील सूचनेप्रमाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरकुल, पीक विमा अशा सर्व प्रकारचे सर्वे करणे अशा विविध माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवरील सर्व कामांचा निपटारा करण्यात संगणक परिचारक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. प्रत्येक संगणक परिचारकाला सुमारे सात हजार रुपये मानधन दिले जाते.
जानेवारी महिन्यात मानधन मिळाले. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे तीन महिने मानधन मिळाले नाही. याबाबत जिल्हा परिषद अथवा वरिष्ठ पातळीवर चौकशी करूनही समर्पक उत्तरे दिली जात नाहीत. दिलेल्या कंपनीकडून वेळेत मानधन मिळावे, अशी माफक अपेक्षा परिचारकांकडून केली जात आहे.

दाद मागायची कोणाकडे ?
ग्रामपंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामांबाबत वेळोवेळी तगादा लावला जातो. वेळेत काम झाले नाही तर जबाबदारही धरले जाते. पण पगाराच्या बाबतीत मात्र कानावर हात ठेवून नेमून दिलेल्या कंपनीकडे बोट दाखवत यांची जबाबदारी आहे, असे सांगितले जात असल्याने दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न परिचारकांसमोर आहे.


रखडलेल्या मानधनाबाबत जिल्हा परिषदेकडे चौकशी केली असता चार-आठ दिवसात खात्यावर मानधन जमा होईल, असे उत्तर दिले जाते. प्रत्येक वेळी हेच उत्तर मिळत असल्यामुळे काम करायचे कसे असा प्रश्न परिचारकांपुढे पडला आहे.
-प्रशांत भोसले, संगणक परिचारक, बारामती तालुकाप्रमुख

परिचारक कामासाठी दिवसभराचा पूर्ण वेळ जातो. यातूनही केलेला कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे घर प्रपंच चालवायचा कसा हा प्रश्न आमच्यासमोर आहे. शासनाने आमच्या मागणीचा विचार करावा.
-राहुल गाडेकर, संगणक परिचारक, वाकी (ता. बारामती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT