चिंतामणी क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
वडगाव निंबाळकर, ता. २० : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरे उपचारासाठी घेऊन जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. गोठ्यावर येऊन उपचार देणाऱ्या डॉक्टरांकडे पशुपालक सर्व जबाबदारी देतात. यामुळे खासगी उपचार घेण्याला पसंती मिळते. सरकारी दवाखान्याचा उपयोग फक्त लसीकरण आणि जनावरांसंदर्भातील शासकीय योजनांच्या कामांसाठी होत आहे.
वडगाव निंबाळकर, चोपडज, कोऱ्हाळे खुर्द या तीन गावांतील जनावरांसाठी श्रेणी एकचा दवाखाना आहे. दवाखान्याची इमारत सुसज्ज आहे औषधांचा साठा आहे. परंतु पशुपालक मात्र दवाखान्याकडे फिरकत नाहीत. वडगाव निंबाळकर गावठाण भागातील पशुपालक आपली जनावरे घेऊन जातात इतर भागातील शेतकरी येत नाही.
बागायती परिसर असल्यामुळे जनावरांसाठी भरपूर चारा उपलब्ध होतो. ऊस तोडणीच्या हंगामात मुबलक चारा जनावरांसाठी असल्यामुळे दूध उत्पादन प्रमुख व्यवसाय बनला आहे. संकरित गाईंची संख्या अधिक आहे. मोठ्या गाईंना सरकारी दवाखान्यापर्यंत घेऊन जाणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. यामुळे खासगी डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागत आहेत.
पुशपालकांकडून या सुविधाची अपेक्षा
- रक्त तपासणी सुविधा
- जनावरे ज्या भागात असतील तेथील सार्वजनिक ठिकाणी खोडा बसवणे
- दवाखान्यातील रिक्त जागांची भरती करावी.
वडगाव निंबाळकरसह वानेवाडी नांनगाव (ता. दौंड) येथील अतिरिक्त भार माझ्यावर होता. अधिकतम गावाची जबाबदारी पार पाडावी लागते. शासकीय योजनांच्या माध्यमातून नुकतेच दहा पशुपालक शेतकऱ्यांना उद्योजक बनवले आहे.
- डॉ. अवधूत जोशी, पशुवैद्यकीय अधिकारी
संकरित गाई आजारी पडल्यास तत्काळ डॉक्टरांची आवश्यकता भासते सरकारी अधिकारी रात्री अपरात्री उपलब्ध होत नाहीत. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
- संतोष दरेकर, पशुपालक
पशुधन संख्या
गाई..........४१८५
म्हशी..........१९०
शेळी..........७९१
मेंढी..........७७९
डुक्कर..........१५०
लसीकरण
लंपी - ..........३९६२
घटसर्प..........१६२४
फऱ्या..........१९४
लाळ खुरकूत..........४६७५
रेबीज..........४८
देवी..........४९०
आंत्रविशार..........२८०३
कोंबडी मानमोड..........३६३३
तपासणी
कृत्रिम रेतन..........३४१
शस्त्रक्रिया..........११८
वंध्यत्व तपासणी..........४७१
आतापर्यंत जनावरांवर झालेले उपचार
जंत निर्मूलन..........३२००
गोचीड निर्मूलन..........१४००
किरकोळ उपचार..........११९२
02920
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.