पुणे

इंदापुरात हिरव्या चाऱ्याची टंचाई

CD

वडापुरी, ता. ८ : इंदापूर तालुक्यात जनावरांसाठी लागणाऱ्या हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण लागली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मकवानाच्या चाऱ्याला मोठी मागणी होत असून, प्रतिगुंठा १२०० ते १८०० रुपयांपर्यंत बाजारभाव पोचला आहे.

वर्षभर हिरवा चारा उपलब्ध राहावा, यासाठी अनेक शेतकरी नियोजनबद्ध शेती करत मका, कडवळ असे पिके घेत आहेत. हिरव्या चाऱ्याचा खर्च हा दूध उत्पादनातील मुख्य खर्च असल्याने मकवानापासून मुरघास बनविण्याकडे सुद्धा शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मकवानाचे पीक वाया गेले आहे. सध्या बहुतांश शेतांमध्ये पाणी साचल्याने चारा उत्पादनात अडथळे आले आहेत. त्यामुळे हिरव्या मकवनाला मोठी मागणी वाढली आहे. या मकवनाला प्रतिगुंठा १२०० ते १८०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे वडापुरी येथील दूध उत्पादक शेतकरी शौकत शेख यांनी सांगितले.

दुभत्या जनावरांना जर हिरवे मकवान चारा म्हणून दिले तर दूध उत्पादन स्थिर ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मुरघास करून ठेवण्यास शेतकऱ्यांचा कल वाढला असून, हे मुरघास चारा टंचाईच्या वेळी उपयोगी पडत असल्याचे मत शेतकरी विलास गायकवाड यांनी व्यक्त केले.

इंदापूर तालुक्यात मकवानाचे पीक वर्षभर तिन्ही हंगामात घेतले जात असून, साडेतीन ते चार महिन्यांत चारा पीक येत असल्याने दूध व्यवसायासाठी व मुरघासासाठी अनेक शेतकरी मकवानाची लागवड करत आहेत. सध्या वडापुरी, अवसरी, बेडसिंग, शेटफळहवेली, लाखेवाडी, खोरोची, भांडगाव, भाटनिमगाव, बाभूळगाव,
तरटगाव, कांदलगाव, हिंगणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मका लावली असून, ते वाढीच्या अवस्थेत असून विक्रीस येण्यासाठी सुमारे २ ते २.५ महिने लागणार आहेत. त्यामुळे या मकवानाला येणाऱ्या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात भाव मिळणार असल्याचे चित्र आहे.
02930

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT