पुणे

अठरा गाव मावळातील विद्युत सेवा विस्कळित

CD

वेल्हे, ता. १९ ः अठरा गाव मावळ परिसरातील हारपूड, भोर्डी या गावात गुरुवार (ता. १८) रोजी सायंकाळच्या दरम्यान झालेल्या जोरदार अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडलेल्या विद्युत पोलमुळे परिसरातील विद्युत सेवा विस्कळित झाली असून येथील एका शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडाल्याची माहिती ग्रामसेवक आर. बी. क्षीरसागर यांनी दिली.
गुरुवारी सायंकाळी चारनंतर सुरुवात झालेल्या वादळी पावसाने रौद्ररूप धारण करत सलग दीड ते दोन जोरदार बॅटिंग केल्याने या परिसरात अनेक झाडे विद्युत पोल उन्मळून पडले. यामध्ये डोंगर माथ्यावर असलेल्या हारपूड गावातील स्ट्रीट लाईटचे चार पोल तर पाणीपुरवठ्याचे दोन पोल, भोर्डी गावातील पाच विजेचे पोल उन्मळून पडले तर केळदवाड, निगडे खुर्द, पिशवी गावातील रोहित्र स्ट्रक्चर वाकले आहे. मोहरी गावात वीज पडून निकामी झालेले रोहित्र तत्काळ बदलण्यात आल्याची माहिती वेल्हे येथील शाखा अभियंता विलास शिंदे यांनी दिली.
आज शुक्रवार (ता.१९) रोजी महावितरणचे कर्मचारी सतीश वाघतोडे, सूर्यकांत शिंदे, राजू खोपडे, मारुती भुरुक, लाइनमन समीर मुजावर यांनी युद्ध पातळीवर काम करत मोहरी गावातील निकामी झालेले विद्युत रोहित्र बदलून शक्य तेवढा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. परंतु उन्मळून पडलेले विद्युत पोल व वाकलेले पोल दुरुस्त होण्यासाठी वेळ लागणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
दरम्यान, हारपूड येथील शेतकरी नामदेव रामजी कचरे यांच्या घरावरील पत्रे उडाले असून या घराचा पंचनामा घटनास्थळी जाऊन केला असल्याची माहिती ग्रामसेवक क्षीरसागर यांनी दिली. किल्ले राजगड परिसरात सुद्धा जोरदार पाऊस पडल्याने येथील भात खाचरांना तळ्याचे रुप आल्याची माहिती येथील स्थानिक विकास नलावडे यांनी दिली
याबाबत वेल्ह्याचे तहसीलदार दिनेश पारगे म्हणाले, ‘‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्थानिक पंचनामा करून मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT