पुणे

वेल्हे बुद्रुकमध्ये अखेर बसविले सौरदिवे

CD

वेल्हे, ता. ८ ः वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) ग्रामपंचायत हद्दीत ठेकेदाराकडून शुक्रवारी (ता. ५) पहाटे येऊन एका हायमास्ट सौर दिव्याचे काम पूर्ण केले, तर दुसरा सौर दिवा बसवण्याचे काम रविवारी (ता. ७) सायंकाळी उशिरापर्यंत चालू असल्याची, माहिती वेल्ह्याच्या सरपंच सीता खुळे व माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य निखिल गायकवाड यांनी दिली .
येथे गेल्या सहा महिन्यापासून काम प्रलंबित ठेवून बोगस बिल काढल्यासंदर्भाची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होत संबंधित ठेकेदाराकडून हे काम करून घेण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतीसह नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले.
वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात दोन सौर हायमास्ट दिवे उभारण्याच्या कामाला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने मंजुरी दिली होती. सौरदिवे बसविण्यासाठी संबंधित ठेकेदाराने सहा महिन्यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात साहित्य आणून ठेवले, मात्र सौरदिवे उभारले नाही. याउलट ठेकेदाराने हायमास्ट सौरदिवे न बसवता बनावट कागदपत्र व बोगस जिओ टॅग फोटोसह ग्रामसेवकांच्या खोट्या व बनावट सही शिक्क्यांचा वापर करीत जिल्हा परिषदेमधून १० लाख रुपयांचे बिल घेतल्याचा आरोप संबंधित ठेकेदार भोसरी, पुणे यांच्यावर ठेवत सरपंच सीता खुळे, माजी सरपंच संदीप नगिने, ग्रामपंचायत सदस्य सुनील कोळपे, माजी उपसरपंच निखिल गायकवाड, खंडू गायकवाड, रूपेश पवार, विलास पांगारे यांनी केला होता. या संदर्भात संबंधित ठेकेदारावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी वेल्ह्याच्या सरपंच सीता खुळे व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेले काम, तसेच बोगस कागदपत्रांच्या आधारे ठेकेदाराने काढलेले बिल यासंदर्भात ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच दोन्ही सौर दिवे ठेकेदाराकडून उभारण्यात आले आहे.
- सीता नंदकुमार खुळे, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, वेल्हे बुद्रुक

‘सकाळ’च्या बातमीनंतर सौरदिवे बसवण्याचे काम झाले असले तरीही बोगस कागदपत्र, तसेच ग्रामसेवकाच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी.
- निखिल गायकवाड, माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, वेल्हे बुद्रुक

03385

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT