पुणे

''छत्रपती''च्या गाळप हंगामाची सांगता

CD

वालचंदनगर, ता. १६ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २०२२-२३ च्या गळीत हंगामामध्ये १४५ दिवसांत आठ लाख ९५ हजार ६८ टन उसाचे गाळप केले. तसेच नऊ लाख ४१ हजार ९०० क्विंटल साखरेची निर्मिती केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ च्या गळीत हंगामाची सांगता बुधवारी (ता.१५) झाली. चालू गळीत हंगाम १४५ दिवस सुरू होता. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून चार कोटी ९१ लाख ८१ हजार ६०० युनिट वीज निर्मिती झाली असून व महाविरणला तीन कोटी ३१ लाख १२ हजार युनिट वीजेची निर्यात करण्यात आली. चालू गळीत हंगामातील अंतिम रिकव्हरीचे मोजमाप सुरू होते. कालपर्यंत सरासरी १०.६० टक्के रिकव्हरी मिळाली होती. चालू वर्षीच्या हंगामाकरिता कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ३१ हजार २३० एकर उसाची नोंद होती. यातील जनावरांच्या चारा, बेणे व गुऱ्हाळासाठी २१०५ एकर क्षेत्रामधील उसाचा वापर झाला.
दरम्यान, सभासदांनी इतर कारखान्यांना ८ हजार २५० एकर क्षेत्रातील ऊस गळीतासाठी दिल्यामुळे कारखान्याना २० हजार ८७५ एकर क्षेत्रामधील ऊस गळितासाठी उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सुमारे अडीच लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. चालू वर्षीचा गळीत हंगाम पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सभासद, बिगर सभासद, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व तोडणी मजूर तसेच विविध संघटनेचे आभार संचालक मंडळाच्या मंडळाच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी मानून ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचा कारखान्याचे वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी संचालक बाळासाहेब पाटील, रणजित निंबाळकर, राजेंद्र गावडे,नारायण कोळेकर, गोपीचंद शिंदे, निवृत्ती सोनवणे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, पांडुरंग दराडे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, युवराज रणवरे, प्रसाद राक्षे, चीफ केमिस्ट सुनील पाटील, मुख्य शेतकी अधिकारी, जालिंदर शिंदे, ऊस विकास अधिकारी प्रवीण कांबळे, ऑफिस सुपरिटेंडेंट अनिल काटे, सिव्हिल इंजिनिअर, तानाजी खराडे, लेबर वेल्फेअर ऑफिसर प्रसाद बिडकर, सुरक्षा अधिकारी दत्तात्रेय पिसे, परचेस ऑफिसर, वीरेंद्र वाबळे, कामगार युनियनचे
अध्यक्ष उपस्थित होते.
---
03057

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT