पुणे

‘छत्रपती’च्या सर्वच सभासदांना मतदान अधिकार

CD

वालचंदनगर, ता. १३ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती कारखान्याच्या सर्व सभासदांना सन २०२३-२८ च्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळणार असल्याचा दावा कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी केला आहे. कारखान्याचे १ मेपर्यंत ‘अ’ वर्गातील २९ हजार ५१४ सभासद असून, ‘ब’ वर्गातील ४१२ सभासद आहेत.
कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत १० मे २०२० रोजी संपली. मात्र, निवडणूक ३ वर्षे रखडली होती. दोन दिवसांपूर्वी साखर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालकांनी कारखान्याच्या मतदारांची प्राथमिक मतदार यादी तयार करून पाठविण्याचा आदेश दिला. यासंदर्भात काटे यांनी सांगितले की, सन २०२० मध्ये संचालक मंडळाने सरसकट सर्व सभासदांची नावे समाविष्ट करून प्राथमिक मतदार यादी पाठविली होती. मात्र, या यादीवर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी आक्षेप घेऊन अक्रियाशील सभासदांना मतदानाचा अधिकार देऊ नये, यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. सदरची याचिका २१ एप्रिल २०२३ मध्ये निकाली काढली असून, न्यायालयाने कायद्यातील तरतुदीस अनुसरून नव्याने मतदार यादी तयार करून निवडणूक कार्यक्रम चार आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक
प्राधिकरणाला दिले आहेत. संचालक मंडळाने न्यायालयामध्ये सभासदांची बाजू मांडून कारखान्याच्या सभासदांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा, यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले.
दरम्यान, सध्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अफवा पसरविल्या जात असून, त्यावर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन संचालक मंडळाने केले.

सन २०१३ मध्ये ९७व्या घटना दुरुस्तीनुसार सहकार कायद्यातील कलम २६ व २७ मध्ये क्रियाशील व अक्रियाशील सभासदाबाबतची तरतूद केली होती. मात्र, २८ मार्च २०२२ रोजी त्यामध्ये सुधारणा होऊन सदरची तरतूद वगळण्यात आली. कारखान्याच्या सर्व सभासदांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. विरोधकांनी सभासदांना मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा केलेला प्रयत्न असफल झाला.
- प्रशांत काटे, अध्यक्ष, छत्रपती साखर कारखाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT