वालचंदनगर, ता.२९ : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची पृथ्वीराज जाचक यांनी बुधवारी (ता.२८) सुत्रे हातात घेतली. तथपूर्वी जाचक हे कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कारखान्याच्या पायरीला नतमस्तक झाले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेमध्ये जाचक कुंटूबाचा मोलाचा वाटा आहे. पृथ्वीराज जाचक यांचे वडील कै.साहेबराव नामदेवराव जाचक हे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते. छत्रपती कारखाना टिकला पाहिजे, कारखाना चांगला चालला पाहिजे, सभासदांना चांगला दर मिळाला पाहिजे, अशी जाचक यांची सुरवातीपासून तळमळ आहे. मला छत्रपतीमधून बाहेर काढले... पण माझ्यातून छत्रपती शेवटच्या श्वासापर्यंत बाहेर पडू शकणार नाही असे जाचक यांनी अनेकवेळा सांगितले होते. छत्रपतीच्या कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पृथ्वीराज जाचक कारखान्याच्या आवारात प्रवेश करताच त्यांचे फटाके व हलगीच्या वाजवून स्वागत करण्यात आले. जाचक यांनी कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पायरीला डोके टेकवून नतमस्तक झाले. नतमस्तक होताना जाचक भावनिक झाल्याचे पहावयास मिळाले.
वडिलांची चारचाकी गाडी घेऊन आले...
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व जाचक कुंटूबाचे वेगळेचे नाते आहे. पृथ्वीराज जाचक यांचे वडील कै.साहेबराव नामदेवराव जाचक हे छत्रपती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते.त्यांनी १९५५ ते १९६० व १९६७ ते १९७० या कालावधीमध्ये कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.तसेच १९७३ ते १९८४ या कालावधीमध्ये संचालक म्हणून काम पाहिले होते. आज तिसऱ्यांदा पृथ्वीराज जाचक कारखान्याने अध्यक्ष झाले.कारखान्यामध्ये प्रवेश करताना त्यांनी वडिलांची आठवण असलेली मारुती गाडी आणली होती.
05170
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.