वाल्हे, ता. २३ : वाल्हे (ता. पुरंदर) पूर्वेकडील अंबाजीचीवाडी परिसरात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. यामुळे खरीप हंगामातील शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून भात लागवडीचा प्रयोग सुरू असलेल्या या परिसरात यंदाही भातशेतीने भरभरून बहर घेतला आहे.
सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने येथील शेतीस पोषक वातावरण तयार झाले आहे. येथील युवा शेतकरी सुधाकर पवार व त्यांची पत्नी वंदना पवार यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत यांत्रिक पद्धतीने भात लागवडीची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत वाल्हे (ता.पुरंदर) परिसरामध्ये समाधानकारक हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. येथील सखल भागात पाणी
साचत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून आम्ही त्या क्षेत्रामध्ये भात लागवड सुरू केली आहे.
अंबाजीचीवाडी परिसरात यंदा मे महिन्यातच विहिरी व नाले ओसंडून वाहू लागले. ही घटना इतिहासात प्रथमच घडल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या निसर्गकृपेचा योग्य वापर करत पवार दांपत्याने तिसऱ्या वर्षीसुद्धा भातशेती सुरू ठेवत उत्पादनात सातत्य राखले आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसामुळे आमच्या शेतात पाणी साठून राहते. याचा फायदा घेत आम्ही भातशेती सुरू केली आहे. यांत्रिक पद्धतीमुळे वेळ,
मजुरी आणि मेहनत वाचते, त्यामुळे उत्पादनही वाढत असल्याचे सुधाकर पवार यांनी सांगितले.
05130