पुणे

‘क्रेडाई’-कुशलतर्फे कामगारांचे प्रशिक्षण पूर्ण

CD

पुणे, ता. ५ : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) अंतर्गत येत्या ६ ते १० जानेवारी दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या ‘इंडिया स्कील्स २०२२’ स्पर्धेत सहभागी १२ तरुण बांधकाम कामगार स्पर्धकांचे कौशल्य प्रशिक्षण क्रेडाई-पुणे मेट्रोच्या कुशल उपक्रमांतर्गत नुकतेच पूर्ण झाले.

विविध राज्यांतील स्पर्धक दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडिया स्कील्स २०२२’ स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेतील विजेते चीन येथे होणाऱ्या ‘जागतिक स्कील्स २०२२’ स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. क्रेडाई-पुणे मेट्रोच्या वतीने या स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. महाराष्ट्राबरोबरच केरळ, ओडिशा, बिहार, मध्य प्रदेश आणि तेलंगण या राज्यांतील एकूण १२ स्थानिक बांधकाम कामगारांचा या प्रशिक्षणामध्ये समावेश होता. त्यांना ब्रिकलेइंग आणि वॉल फ्लोअर टाईलिंगचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्रेडाई-पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष व अमर बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमर मांजरेकर, महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास अधिकारी संध्या चौधरी यांच्या उपस्थितीत कामगारांना प्रशस्तिपत्रके देत सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कुशल क्रेडाई-पुणे मेट्रोचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, सदस्य कविश ठकवानी, महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका ऊर्मिला जुल्का, सदस्या पल्लवी कोठारी, प्रशिक्षण प्रमुख व कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी मांजरेकर म्हणाले, ‘‘कामगारांनी केलेले शास्त्रशुद्ध विटांचे काम व बांधकाम पाहून मला आनंद झाला. त्यांनी केलेल्या बांधकामांमध्ये केवळ शून्य ते १ एमएमच्या त्रुटी आहेत ही आश्चर्याची बाब आहे, असे मला वाटते. याबरोबरच एनएसडीसी टास्क फोर्सचे अध्यक्षपद मिळविल्याबद्दल श्रॉफ आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT