पुणे

पुरंदर विमानतळाचा प्रश्न समन्वयाने सुटावा ः जोशी

CD

पुणे, ता. ७ : उद्योग, व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी पुण्यासारख्या शहराला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने समन्वय साधून पुरंदर विमानातळाचा प्रस्ताव मार्गी लावावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केले आहे.

गेल्या काही वर्षांत पुणे शहर वेगाने विस्तारते आहे. शहर आणि परिसरात औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या, मध्यम आणि लघु उद्योगांची संख्या २ लाखांहून अधिक आहे. शहर परिसरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोनशे कंपन्या असून, हा उद्योगही वाढत आहे. या अनुषंगाने व्यापारसुद्धा वाढत चालला आहे. अशावेळी पुण्याचा अन्य शहरे, राज्ये, परदेशातील २५ महत्त्वाची शहरे यांच्याशी संपर्क वाढणे जरुरीचे आहे. यासाठी पुण्यालगत आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे गरजेचे आहे. गेली काही वर्षे खेड, पुरंदर या ठिकाणच्या जागांच्या निश्चितीत गेली, आता विमानतळ प्रस्ताव बारगळल्यात जमा होणे पुण्यासाठी परवडणारे नाही. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वय साधून लवकरात लवकर सर्वमान्य तोडगा काढावा आणि विमानतळाचे काम सुरू करावे, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT