पुणे

पुण्यात पाच ठिकाणी क्वारंटाइन सेंटर महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरु; साडेअकराशे बेडची व्यवस्था करणार

CD

पुणे, ता. १० : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांना घरामध्ये क्वारंटाइन होण्यासाठी जागा नसल्याने महापालिकेने क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शहरात पाच ठिकाणी सुमारे ११५० बेडची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

गेल्या आठवड्यापासून शहरात पुन्हा कोरोना संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढली, तरी गंभीर रुग्णांची किंवा ऑक्सिजनची गरज असणाऱ्यांची संख्या कमी आहे. बहुतांश नागरिक हे घरातच क्वारंटाइन होऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेऊन बरे होत आहेत. रविवारी (ता. ९) शहरात एकाच दिवशी लागण होण्याचा आकडा चार हजारच्या पुढे गेला आहे. तसेच पुढील काही दिवसांत रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकाच घरात एक किंवा त्यापेक्षा जास्त जणांना लागण होत असल्याने क्वारंटाइन होणे अवघड जात आहे. यामुळे महापालिकेच्या बाणेर येथील कोविड सेंटरमध्ये देखील काही नागरिक दाखल झाले आहेत. सध्या तेथे अडीचशे रुग्णांची क्षमता असून, १५८ जण दाखल आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांची क्वारंटाइन तसेच जेवणाची व्यवस्था महापालिका करणार आहे. महापालिकेच्या शाळा आणि क्रीडांगणे या ठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी त्यांची अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरू आहे.
यात शरद पवार ई-लर्निंग स्कूल, बनकर शाळा, रक्षक नगर क्रीडांगण, बिबवेवाडी येथील अग्निशामक दलाचे क्वार्टर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह आदींचा समावेश आहे. तसेच जेवणाची व्यवस्था सीएसआरमधून केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली.

प्रस्ताविक केंद्र आणि क्षमता
शरद पवार इ लर्निंग स्कूल - २००
बनकर शाळा - २००
रक्षक नगर - २५०
अग्निशामक दल क्वार्टर - २००
आंबेडकर वसतीगृह - २००

जम्बो तयार पण प्रवेश नाही
महापालिकेने सोमवारपासून शिवाजीनगर येथील सीओईपी जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांना प्रवेश सुरू करणार असल्याचे सांगितले होते. त्यादृष्टीने सर्व तयारी झाली असली, तरी अद्याप तेथे रुग्णांसाठी सेवा सुरू केली नाही. गरज पडल्यास पहिल्या टप्प्यात १०० बेडचे क्वारंटाइन सेंटर याठिकाणी सुरू केले जाऊ शकते. दरम्यान, बाणेर येथील कोविड सेंटरची क्षमता २५० इतकी असून, तेथे सध्या १५८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी काही जण केवळ क्वारंटाइन
होण्यासाठी दाखल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT