Indian Navy
Indian Navy Sakal
पुणे

भारतीय नौदलात प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

भारतीय नौदलात अधिकारी म्हणून काम करण्याची अनोखी संधी तरुणांना मिळणार आहे. नौदलाच्या विविध विभागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

पुणे - भारतीय नौदलात (Indian Navy) अधिकारी (Officer) म्हणून काम करण्याची अनोखी संधी तरुणांना (Youth) मिळणार आहे. नौदलाच्या विविध विभागांसाठी प्रवेश प्रक्रिया (Admission Process) सुरू झाली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज (Online Form) प्रक्रिया सुरू झाली असून, ही प्रवेश प्रक्रिया महिला व पुरुष उमेदवारांसाठी आहे. गुरुवारपर्यंत (ता. १०) उमेदवारांना अर्ज करता येईल.

नौदलाच्या एक्झिक्युटिव्ह विभागासाठी ही प्रवेश प्रक्रिया असून, यामध्ये ५० जागा राखीव ठेवल्या आहेत. यासाठी बी.ई, बी.टेकमध्ये किमान ६० टक्के गुण असणे आवश्‍यक असून, वयोमर्यादाही देण्यात आली आहे. त्याचबरोबर एनसीसीचे सी सर्टिफिकेट असलेल्या उमेदवारांना देखील या थेट प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज करता येणार आहे. या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना एझिमाला येथील इंडियन नेव्हल अकॅडमीत प्रशिक्षण दिले जाईल.

नौदलाच्या वतीने बारावी उत्तीर्ण झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी कायमस्वरूपी आयोगांतर्गत (पीसी) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार मंगळवारपर्यंत (ता. ८) इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येईल. शैक्षणिक आणि तांत्रिक विभागासाठी होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेत एकूण ३५ जागा राखीव ठेवल्या आहेत. या प्रक्रियेत लेखी परिक्षा होणार नसून थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीच्या (एसएसबी) माध्यमातून निवड केली जाणार आहे. यासाठी विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. तसेच, बारावीत भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हे विषय असणे आवश्‍यक असून, जेईई परिक्षेतील गुणदेखील गृहित धरले जाणार आहेत.

या दोन्ही प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT