अंगणवाडीत नोकरीची सुवर्ण संधी; 8 वी, 10 वी उत्तीर्णांसाठी करता येणार अर्ज

Anganwadi Recruitment 2022
Anganwadi Recruitment 2022 esakal
Summary

अंगणवाडीत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Anganwadi Recruitment 2022 : अंगणवाडीत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला आणि बाल विकास, शिमोगा यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस (WCD Anganwadi Shivamogga Recruitment 2022) या पदांसाठी भरती जारी केलीय. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार anganwadirecruit.kar.nic.in अंगणवाडीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी आहे.

याशिवाय, उमेदवार https://wcd.karnataka.gov.in/english या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी (Anganwadi Recruitment 2022) थेट अर्ज करू शकतात. तसेच, तुम्ही https://anganwadirecruit.kar.nic.in/docs/25810145817.pdf या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 137 पदे भरली जाणार आहेत.

Anganwadi Recruitment 2022 : महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 13 जानेवारी

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी

Anganwadi Recruitment 2022
निवृत्तीनंतर शिक्षकानं गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दिले तब्बल 40 लाख

रिक्त जागांचा तपशील

अंगणवाडी सेविका व मदतनीस – 137

पात्रता निकष : उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 8 वी आणि 10 वी उत्तीर्ण असावा.

भरतीसाठी वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावी.

निवड निकष : मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com