Pune River Jalparni
Pune River Jalparni Sakal
पुणे

पुणे महापालिकेकडून जलपर्णीला फक्त ‘दे धक्का’!

सकाळ वृत्तसेवा

मुळामुठा नदीमध्ये मोठ्याप्रमाणात जलपर्णी असताना देखील महापालिकेचे मलःनिसारण विभाग मात्र, जलपर्णी काढून घेण्यापेक्षा ती पुढे वाहत कशी जाईल याचीच वाट पाहात असल्याचे समोर आले आहे.

पुणे - मुळामुठा नदीमध्ये (Mula Mutha River) मोठ्याप्रमाणात जलपर्णी (Jalparni) असताना देखील महापालिकेचे (Municipal) मलःनिसारण विभाग मात्र, जलपर्णी काढून घेण्यापेक्षा ती पुढे वाहत कशी जाईल याचीच वाट पाहात असल्याचे समोर आले आहे.

पुणे महापालिकेने स्पायडर मशिनने मुळामुठा नदीतील जलपर्णी काढण्याचे काम खासगी ठेकेदाराला दिले आहे. एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत याची मुदत आहे. मुळामुठा नदीमध्ये येणाऱ्या सांडपाण्यामुळे मोठ्याप्रमाणात जलपर्णी वाढते. जलपर्णी न काढल्यास नदी काठच्या परिसरात डासांचाही प्रादुर्भाव होतो. त्यामुळे महापालिकेकडून जलपर्णी काढण्यासाठी निविदा काढली जाते. यापूर्वी आरोग्य विभागाकडून जलपर्णी काढली जात होती, पण गेल्यावर्षीपासून हे काम मलःनिसारण विभागाला दिले आहे. कोरोनाच्या काळात महापालिकेने अत्यावश्यक कामाच्या सबबी खाली ६७ (३) (क) या नियमाखाली खासगी ठेकेदाराकडून स्पायडर मशिनच्या साह्याने जलपर्णी काढण्याचे काम मंजूर करून घेतले.

गेल्या काही दिवसांपासून मुठा नदीमध्ये जलपर्णी वाहून येत आहे. महापालिकेने राजाराम पूल येथे महापालिकेकडून काम सुरू आहे, त्यामुळे नदीमध्ये भराव टाकल्याने जलपर्णी आडून राहिल्याने या भागात लांबपर्यंत जलपर्णीची हिरवी चादर पसरलेली दिसून येत होती. पण आता राजाराम पुलापासून संगमवाडीच्या दिशेने जलपर्णी वाहत येत आहे. अनेक ठिकाणी ही जलपर्णी थांबून राहात असल्याने तेथेच त्यास पाने फुटून जलपर्णी वाढत आहे. महापालिकेने राजाराम पुलाच्या इथेच जलपर्णी बाजूला काढून घेणे आवश्‍यक आहे. मात्र, महापालिकेचा मलःनिसारण विभाग ही जलपर्णी पुढे वाहून जाण्याची वाट पाहत आहे. ही जलपर्णी संगमवाडी किंवा मुंढवा जॅकवेल येथे काढली जाईल, असे असे मलःनिसारण विभागाचे अधिकारी सांगत आहेत.

मुदत संपण्यापूर्वी कार्यवाही आवश्‍यक

महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराची मुदत ३१ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. त्यापूर्वी ठेकेदाराकडून मुळामुठा नदीतील जलपर्णी काढून टाकणे आवश्‍यक आहे. अन्यथा एप्रिलनंतर पुन्हा नवीन ठेकेदार नियुक्त होईपर्यंत जलपर्णीचे काढण्याचे काम बंद होण्याची शक्यता आहे.

ठेकेदाराने जलपर्णी काढल्याचा रोजचा अहवाल आम्हाला मिळतो. त्यानुसार नदी तसेच तलावातील जलपर्णी काढली आहे. मुठा नदीत जलपर्णी आदेश मलःनिसारण विभागाला दिले जातील, तसेच नदी किंवा तलावात जलपर्णी असेल तर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या मलःनिसारण विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याने ठेकेदाराशी संपर्क साधून जलपर्णी काढून घ्यावी आणि त्याचे मोजमाप घ्यावे, असे आदेश दिले आहेत.

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

उन्हाळ्यात काढली ३९ लाखाची जलपर्णी

एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना महापालिकेने जलपर्णी तातडीने एका कंपनीस कामाचे आदेश दिले होते. ७ एप्रिल ते १८ जून या कालावधीत या ठेकेदाराने जलपर्णी काढण्यासाठी स्पायडर मशिन, जेसीबी, डंपर व ६५६ बिगाऱ्यांचा वापर करून ३८ लाख ८० हजार रुपये खर्च केला. पण या काळात किती जलपर्णी काढली याचा उल्लेख स्थायी समितीला सादर झालेल्या विषयपत्रात नव्हता. हा खर्च स्थायीने मंजूर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT