online class e sakal
पुणे

शाळा व खासगी क्लासमध्ये होणारी टवाळखोरी आता ऑनलाइन क्लासमध्ये

शाळा व खासगी क्लासमध्ये होणारी टवाळखोरी आता ऑनलाइन होऊ लागली आहे. विविध ॲपद्वारे भरणाऱ्या वर्गांमध्ये काही अनोळखी अल्पवयीन मुले व टवाळखोर तरुण सहभागी होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शाळा व खासगी क्लासमध्ये होणारी टवाळखोरी आता ऑनलाइन होऊ लागली आहे. विविध ॲपद्वारे भरणाऱ्या वर्गांमध्ये काही अनोळखी अल्पवयीन मुले व टवाळखोर तरुण सहभागी होत आहेत.

पुणे - शाळा (School) व खासगी क्लासमध्ये (Private Class) होणारी टवाळखोरी आता ऑनलाइन (Online) होऊ लागली आहे. विविध ॲपद्वारे भरणाऱ्या वर्गांमध्ये काही अनोळखी अल्पवयीन मुले (Minor Childrens) व टवाळखोर तरुण (Youth) सहभागी होत आहेत. हे टवाळखोर (Violence) विद्यार्थिनी व शिक्षिकांशी अश्‍लील भाषेत (Pornography) बोलण्यासह शिवीगाळही करतात. यासंदर्भात पालकांनी (Parents) तक्रारी करूनही काही शाळा, खासगी क्‍लासचालक पोलिसांकडे (Police) जाण्यास तयार नाहीत. याउलट काहींनी ऑनलाइन वर्ग बंद करून पुन्हा ऑफलाइन वर्ग सुरू केले. मात्र, या प्रकारांबाबत सायबर पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.

कोरोनामुळे शहरातील शाळा, खासगी क्‍लासचालकांकडून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेऊन शिक्षण सुरू ठेवले. आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने शाळा, क्‍लास पुन्हा सुरू झाले; तरीही काही पालकांकडून मुलांच्या आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अजूनही ऑनलाइन वर्गांना पसंती दिली आहे. मात्र, या वर्गांमध्ये येणाऱ्या टवाळखोरांमुळे विद्यार्थी, शिक्षक त्रस्त झाले आहेत.

असा सुरू आहे गैरप्रकार

विद्यार्थ्यांसाठी शाळा, खासगी चालकांकडून विविध प्रकारच्या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून वर्ग भरविले जातात. ऑनलाइन वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी लिंक, मीटिंग आयडी त्यांच्याकडून विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर पाठविल्या जातात. त्यातूनच या लिंक शाळा, खासगी क्‍लास, पालक किंवा वर्गाशी संबंधित नसणाऱ्या व्यक्तींनाही मिळत आहेत. यामुळे काही अल्पवयीन मुले व टवाळखोर तरुण ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यानंतर आक्षेपार्ह व अश्लील भाषेत विद्यार्थिनी, शिक्षिकांबद्दल बोलतात. त्याचबरोबर त्यांना शिवीगाळ करणे, धमक्‍या देण्याबरोबरच विद्यार्थिनी व शिक्षिकांना लज्जा उत्पन्न होईल, अशा पद्धतीचे मेसेजही वर्ग सुरू असताना टाकले जातात. हा सर्व प्रकार ऑनलाइन असणाऱ्या सर्वच विद्यार्थी, विद्यार्थिनींना दिसत असून, त्यांच्या मनातही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

हा गैरप्रकार काही पालकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर काहींनी संबंधित शाळा व खासगी क्‍लासचालकांकडे तक्रार केली. तसेच, या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार देण्याच्या सूचनाही केल्या. परंतु, हा सर्व प्रकार स्वतः अनुभवत असूनही शाळा किंवा खासगी क्‍लास चालकांकडून पोलिसांकडे जाण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे टवाळखोरांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला असल्याची तक्रार पालकांनी केली.

मोफत सहभाग पडतोय ‘महाग’

शाळा, खासगी क्‍लासचालकांकडून ऑनलाइन वर्गांसाठी विविध प्रकारच्या मोबाईल ॲप्लिकेशन वापर केला जात आहे. काही अपवादात्मक शाळा, क्‍लासेसकडूनच सशुल्क मोबाईल ॲप वापरले जात आहेत. उर्वरित बहुतांश शाळा, क्‍लासचालकांकडून मोफत ॲप वापरावर भर दिला जात आहे. परिणामी, मोफत ॲपमध्ये वैयक्तीक सुरक्षिततेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने बाहेरील व्यक्ती सहजपणे ऑनलाइन वर्गामध्ये प्रवेश करत आहेत.

‘ऑनलाइन वर्गामध्ये प्रवेश करणाऱ्या काही अनोळखी व्यक्तींकडून असे प्रकार घडत आहेत. त्याविषयी आमच्याकडे काही तक्रारीही आल्या आहेत. त्यादृष्टीने संबंधित लिंकचा वापर करणाऱ्याची आयपी ॲड्रेसवरून त्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. काही मोबाईल ॲप कंपन्यांकडून आम्ही माहिती मागविली आहे. सशुल्क मोबाईल ॲपवरून अशा अनोळखी व्यक्तींचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो. त्यादृष्टीने अद्यापही आमच्याकडे त्याविषयी तक्रारी आलेल्या नाहीत. शाळा, खासगी क्‍लासचालकांनी तक्रारी दाखल कराव्यात, त्याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई केली जाईल.’

- डी. एस. हाके, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

‘ऑनलाइन झूम मिटिंगद्वारे वर्ग घेतले जात होते. परंतु, आम्ही पाठवलेल्या मीटिंग आयडी बाहेरील त्रयस्थ व्यक्तींकडे जाऊन त्या व्यक्ती क्‍लासचालक, शिक्षक किंवा विद्यार्थ्यांच्या नावांचा वापर करून अतिशय घाणेरड्या व अश्लील भाषेत कॉमेंट, चॅटिंग करीत होते. त्याबाबत पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे जाण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही हा प्रकार टाळण्यासाठी ऑनलाइन वर्ग बंद करून आता ऑफलाइन वर्ग सुरू केला आहे.’

- खासगी क्‍लासचालक

इथे साधा संपर्क -

- सायबर पोलिस ठाणे - ०२०- २९७१००९७

- ई-मेल - crimecyber.pune@nic.in

यासंदर्भात तुमचेही काही अनुभव असतील, तर नक्कीच आमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. ‘सकाळ’चा व्हॉट्सअप क्र. ८४८४९७३६०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack : कुत्र्यांनी वाचवले मालकाचे प्राण! मेंढपाळांवर बिबट्याचा हल्ला; मात्र कुत्र्यांनी केलेला हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

SCROLL FOR NEXT