Airport
Airport Sakal
पुणे

पुणे : सांडपाण्याच्या बंदोबस्तामुळे विमानतळ सुरक्षीत

​ ब्रिजमोहन पाटील

लोहगाव येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या जवळच लोहगाव परिसरातील सांडपाणी जमा होत असल्याने तेथे पक्षी जमा होत होते. त्यामुळे विमानांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.

पुणे - लोहगाव येथील विमानतळाच्या (Airport) धावपट्टीच्या जवळच लोहगाव परिसरातील सांडपाणी (Drainage Water) जमा होत असल्याने तेथे पक्षी (Bird) जमा होत होते. त्यामुळे विमानांच्या सुरक्षेला (Plane Security) धोका (Danger) निर्माण झाला होता. ही गंभीर चूक विमानतळ प्राधिकरणाने महापालिकेच्या लक्षात आणून देताच, त्याठिकाणी १२०० मी.मी. व्यासाची वाहिनी टाकून सांडपाण्याचा बंदोबस्त केला आहे.

लोहगाव विमानतळावरून देशभरातील प्रमुख शहरांसह परदेशातील विमानांची जा ये असते. तसेच हे विमानतळ हवाई दलाचे प्रमुख केंद्र असल्याने याठिकाणी कडक सुरक्षा असते. विमानतळाच्या धावपट्टीच्या परिसरात पक्षी, प्राणी येऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या असतात. विमान उतरताना किंवा उडताना पक्षाची धडक झाल्यास अपघात होण्याची शक्यता असते व यात जिवितहानीचा धोका असतो. असे असतानाही विमानतळाच्या लगतच्या भागातील मैलापाणी वाहत येऊन धावपट्टीपासून काही अंतरावरील खड्ड्यात जमा होत होते. त्यामुळे विमानांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.

हा प्रकार विमानतळ प्राधिकरणाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर गेल्या महिन्यात महापालिका व प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी याठिकाणी पाहणी केली होती. ज्याठिकानांहुन विमाने खाली उतरतात (लँडींग) तेथे जवळच खड्डा आहे. या खड्ड्या मध्ये लगतच्या परिसरातील सांडपाणी जमा होत आहे. या सांडपाण्यातील कीटक खाण्यासाठी पक्षी येत असल्याने विमानांना धोका निर्माण झाला आहे हे महापालिकेला निदर्शनास आणून देऊन सांडपाण्या प्रश्न मार्गी लावावी अशी विनंती विमानतळ प्राधिकरणाने महापालिका केली.

९० मीटरची सांडपाणी वाहिनी टाकली

सांडपाणी साचत असल्याने त्याची गंभीर दखल महापालिकेने घेतली. महापालिकेतर्फे २०१७ मध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये ३९० कोटी रूपायांचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गतच येथे सांडपाणी वाहिनी टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. विमानतळाच्या हद्दीतून ९० मीटर लांबीची १२ मीमी व्यासाची सांडपाणी वाहिनी टाकून ते पाणी बाहेर आणले आहे. पुढील काम देखील सुरू झाले आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.

'लोहगावचा उर्वरित भाग नुकतेच महापालिकेत समाविष्ट झाला आहे. त्या भागातील सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नसल्याने ते पाणी उघड्यावरूनच वाहात जाऊन विमानतळाच्या हद्दीतील खड्ड्यांमध्ये साठते. या पाण्यातील किटक खाण्यासाठी पक्षी येत असल्याने विमानांना धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी संयुक्त पाहणीनंतर तातडीने सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली आहे."

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: डेव्हिडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

SCROLL FOR NEXT