pune muncipal corporation
pune muncipal corporation sakal
पुणे

पुणे : महापालिकेच्या मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्यानंतर थकबाकीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्यानंतर त्याचे वेळेवर भाडे भरले जात नसल्याने थकबाकीचा आकडा फुगत चालला आहे. त्यामुळे महापालिकेने आता शासकीय कार्यालयांकडेही भाडे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. गृह विभागाने दीड कोटी रुपये भरले आहेत. तर इतर नऊ विभागांनी १.८१ कोटी रुपयांचे भाडे थकविले आहे.

शहरात महापालिकेच्या सुमारे तीन हजार मिळकती आहेत. यातील बहुतांश मिळकती या महापालिकेतर्फे वापरात आणलेल्या आहेत. पोलिस विभाग, महसुल विभाग, सह दुय्यम निबंधक विभाग, महारेरा, पीएमटी यासह इतर शासकीय कार्यालयांना महापालिकेच्या जागा भाडेत्त्वाने दिल्या आहेत. महापालिकेच्या जागा वाटप नियमावली २००८ नुसार संबंधित भागातील रेडिरेकनरच्या दरानुसार खासगी व्यावसायिकांना जागा दिली जाते.

तर खासगी व्यवसायिकांना जो दर लावला जातो त्याच्या २० टक्के कमी दराने शासकीय कार्यालयांना जागा, गाळे, हॉल भाडेत्त्वावर दिली जाते.
मालमत्ता व्यवस्थापनाने खासगी व्यवसायिकांकडून व शासकीय कार्यालयांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी भाडेकरूंवर कारवाईचा बडगा उचलून गाळे, कार्यालये सील केली जात आहेत.

गेल्या वर्षभरात यातून ३८ कोटीची थकबाकी वसूल केली आहे. तर शासकीय कार्यालयांकडे साडेतीन कोटी रुपयांची थकबाकी होती, त्यामध्ये सर्वाधिक पोलिसांकडे १.५० कोटी रुपये थकीत होते. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने यासाठी पाठपुरावा करून ही दीड कोटींची थकबाकी वसूल केली आहे. तर महसुल विभाग, पोस्ट आॅफिस, सह दुय्यम निबंधक विभाग, महारेरा यांच्याकडे १.८१ कोटी रुपये थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी नोटीस पाठविली आहे.

महापालिकेने शासकीय कार्यालयांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे, त्यामुळे पोलिसांकडून दीड कोटी रुपये मिळाले आहेत. इतर कार्यालयांकडेही पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेकडून गाळे, कार्यालये भाड्याने दिली जाणार आहे. त्यासाठी शासकीय संस्थांना प्राधान्य दिले जाणार आहे.

- राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग

भाडेतत्त्वावर दिलेल्या जागा
पोलिसांचे कार्यालय - ४
महावितरण - ६४
पीएमपी - २४
मेट्रो - ९

अन्य शासकीय कार्यालय - ३४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT