Flyover Bridge
Flyover Bridge Sakal
पुणे

पुणे : दुहेरी उड्डाणपुलानंतरही ट्रॅफिक जॅम

सकाळ वृत्तसेवा

कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकामध्ये अटलबिहारी वाजपेयी दुहेरी उड्डाणपूल बांधून तेथील वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात आला.

पुणे - अभिनव चौकातील (नळस्टॉप) वाहतूक कोंडी (Traffic) फोडण्यासाठी मेट्रोच्या पुलालगत दुहेरी उड्डाणपूल (Double Flyover) बांधण्यात आल्याने वाहतुकीची (Transport) समस्या (Problem) सुटणार, असा सार्वत्रिक समज होता, मात्र इथे केवळ डेक्कनकडून पौडफाट्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना (Vehicle Driver) दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्षात विधी महाविद्यालय रस्त्यावरून येणाऱ्या हजारो वाहनचालकांना पुढे पौड फाट्याकडे जाताना अरुंद रस्त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्याचा फटका नोकरदार, विद्यार्थ्यांसह प्रवाशांनाही बसत आहे.

कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकामध्ये अटलबिहारी वाजपेयी दुहेरी उड्डाणपूल बांधून तेथील वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात आला. या उड्डाणपुलामुळे डेक्कनहून पौड फाट्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला. एकीकडे हे समाधानकारक चित्र असले तरी दुसरीकडे विधी महाविद्यालयाकडून येणाऱ्या वाहतुकीला अप्रत्यक्षरीत्या फटका बसल्याची चिन्हे आहेत.

...म्हणून होतेय वाहतूक कोंडी

स्वातंत्र्य चौकापासून दुहेरी उड्डाणपूल सुरु होऊन पुढे एसबीआय बॅंकेजवळ खाली उतरतो. त्यामुळे डेक्कनकडून जाणारी वाहने या पुलावरून पुढे जातात. परंतु विधी महाविद्यालय रस्त्यावरून येणारी वाहने व म्हात्रे पुलावरून अभिनव चौकमार्गे येणारी वाहने पुलाखालून लागू बंधू दुकानासमोरील रस्त्यावरून येतात. दररोज सकाळी व सायंकाळी दोन्ही ठिकाणांहून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यातुलनेत पुलामुळे हा रस्ता अरुंद झाल्याने (बॉटलनेक) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. विधी महाविद्यालय रस्त्यावरून सायंकाळी हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, पिंपरी-चिंचवड या भागातून पौड फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यातच शाळा, महाविद्यालये व अन्य सरकारी, खासगी कार्यालये सुटल्यानंतर या वाहतूक कोंडीमध्ये अधिक भर पडत जाते. पुढे ही वाहतूक कोंडी दशभुजा गणपती चौकापर्यंत जाते. त्यातच पाडळे पॅलेस, महादेव मंदिराकडून येणारी दुचाकी वाहन व पाळंदे मार्गावरुन येणाऱ्या चारचाकी वाहने मुख्य रस्त्यावर आल्यानंतर वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत येथील वाहतूक कोंडी फोडण्यातच वाहतूक पोलिसांचा सर्वाधिक वेळ जात असल्याची सद्यःस्थिती आहे. दरम्यान, डेक्कनकडून पौड फाट्याकडे जाणाऱ्या पीएमपीएल बसने दुहेरी उड्डाणपुलाचा वापर केल्यास वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकेल. त्यामुळे बसने उड्डाणपुलाचा वापर करावा, याबाबत कोथरूड वाहतूक शाखेने पीएमपीएल प्रशासनास पत्र पाठविले आहे.

असे आहेत पर्याय

  • विधी महाविद्यालयाकडून येणाऱ्या वाहनांसाठी सिग्नल यंत्रणेत बदल करून जादा वेळ देणे

  • डेक्कनकडून पौड फाट्याकडे जाणाऱ्या पीएमपी बसने दुहेरी उड्डाणपुलाचा वापर करणे

  • पाडळे पॅलेसकडून येणारी व पाळंदे मार्गावरुन येणारी वाहने कॅनॉलमार्गे पुढे पाठवावीत

  • पाळंदे पथापर्यंतच्या पदपथाची रुंदी कमी करावी, दिशादर्शक फलक लावावेत

दुहेरी उड्डाणपुलामुळे चौकातील वाहतूक कोंडी सुटली. परंतु बस खालील रस्त्याने जात असल्याने पुढील अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. सिग्नलच्या वेळेत बदल केल्यास त्याचाही फायदा होईल. वाहतूक कोंडीमुळे अत्यावश्‍यक कामाच्यावेळीही आम्हाला वाहने बाहेर काढणे मुश्कील होते.

- रवींद्र फडणीस, रहिवासी, मीनल अपार्टमेंट

दुहेरी उड्डाणपुलामुळे अभिनव चौक ते पाळंदे पथापर्यंत रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच पीएमपीच्या बसही उड्डाणपुलाचा वापर करीत नाहीत. त्यामुळे विधी महाविद्यालयाकडील वाहने वाहतूक कोंडीत अडकतात. जादा पोलिस ठेवूनही वाहतूक कोंडी कमी होत नाही. त्यामुळे पदपथ कमी करण्यापासून आणखी वेगळे पर्याय शोधावे लागतील.

- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, कोथरूड वाहतूक विभाग

तुमचे अनुभव मांडा!

अभिनव चौकातील वाहतूक कोंडीच्या सद्यःस्थितीबद्दल नावासह आपली प्रतिक्रिया editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या क्रमांकावर पाठवावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT