traffic
traffic sakal
पुणे

अभिनव चौकातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी वेगळे पर्याय शोधण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अभिनव चौकातील दुहेरी उड्डाणपुलामुळे कर्वे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे या चौकातून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. पोलिस, महापालिका प्रशासनाने त्यावर वेगळे पर्याय शोधावेत. तसेच आणखी काही उपाययोजना करता येतात का, याचाही विचार करावा. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊ शकेल, अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया नागरीकांनी नोंदविल्या.


‘‘उड्डाणपुलामुळे कर्वे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडीत भर पडली. पुलामुळे सोईपेक्षा गैरसोयच जास्त झाली. पुलाखालून तिन्ही रस्त्यांवरून येणारी वाहतूक लागू बंधू दुकानासमोर येत असल्याने तिथे कोंडी होते. सायंकाळी रहदारीच्यावेळी पुलावरून येणारी वाहतूक रोखण्यासाठी पूल उतरताना सिग्नल गरजेचा आहे. कारण पुलावरील वाहतूक ही फक्त डेक्कनकडून येणारी असून तिचे प्रमाण कमी आहे.’’
श्रीकांत आडकर

‘‘वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एसबीआय समोरील बसथांबा पुढे हलवावा. पाळंदे रस्त्यावरून चारचाकी वाहनांना बंदी घालावी व कॉर्नर व कॅनॉल रस्त्यावरुनर ‘नो एन्ट्री’तून येणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून केली जाणारी कारवाईची जागा पोलिसांनी बदलावी. अशा वेगवेगळ्या पर्यायांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल.’’
महेश गोसावी, कर्वे रस्ता

‘‘दुहेरी उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. पुर्वी यापेक्षा बरी स्थिती होती. पोलिसांनी सुचविलेले पर्याय वापरुन तरी वाहतूक कोंडी फुटेल का? हे पाहण्याची गरज आहे.’’
सुरेखा इंगवले, एरंडवणे.

‘‘पौड फाट्याच्या उड्डाणपुलाला जर पुलावरुनच कर्वे रस्त्यावर जाण्यासाठी वाय आकाराचा पुल वाढविला तर, दहभुजा गणपती चौकातील वाहतूक कोंडी सुटेल. अभिनव चौकातून कर्वे रस्त्यावर जाणारी वाहने दशभुजा गणपती चौकात न येता थेट पुलावरुनच चौक ओलांडू शकतील.’’
डॉ. गिरीश रांगणेकर

‘‘वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही संख्या कमी केल्याशिवाय वाहतूक कोंडी कमी होणार नाही. हा उड्डाणपुल इतर सर्व उड्डाणपुलांप्रमाणे खासगी वाहनांची संख्या वाढवायला हातभार लावणार आहे. त्यातच आता करिश्‍मा चौक ते कर्वे पुतळा चौकापर्यंत उड्डाणपुलाचा बेत रचला जात आहे.’’
हर्षद अभ्यंकर, संचालक, सेव्ह पुणे ट्रॅफीक मुव्हमेंट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT