पुणे

धायरीत पाच छोटे कारखाने जाळून खाक

CD

धायरी, ता. १५ : धायरीत शॉर्ट सर्किटमुळे रंग निर्मिती कारखान्याला आग लागली. त्यामुळे सिलिंडर व केमिकल बॅरलचे आठ ते दहा स्फोट झाले. यात पाच छोटे कारखाने आगीत जळून खाक झाले. मात्र, यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
रायकरनगर लेन नंबर २२ या भागात संबंधित रंग निर्मितीचा कारखाना आहे. त्याला आग लागल्याने दाट लोकवस्ती असल्याने दोन ते तीन इमारतींमधील रहिवाशांनी दरवाजे बंद करून जीव वाचवण्यासाठी पळ काढला. आगीची माहिती समजताच पुणे शहर अग्निशामक दल व पीएमआरडीए तसेच सनसिटी व वडगाव येथील आठ ते दहा अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करून आग शमविण्याचे काम सुरू केले. या दरम्यान परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केला. सुमारे दोन तासांनी आग आटोक्यात आली. या कारखान्याच्या परिसरात लाकडाचे व तत्सम कारखाने आणि शेड होत्या. त्यांनाही आगीचा फटका बसला. १५ ते २० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात पाच अनधिकृत शेड होत्या. तेथे फर्निचर निर्मिती तसेच गॅरेज सुरू आहेत.
दरम्यान, सिंहगड रोड ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पंचनामा करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

लोकांचा जीव धोक्यात
बेकायदा कारखाने आणि त्यांच्या शेडचे धायरीसह परिसरात पेव फुटले आहे. ‘सकाळ’ने यापूर्वी ‘नागरी वस्तीतील अनधिकृत कारखानदारीचा फटका’ या आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली. त्यामुळे रंग निर्मितीसारख्या धोकादायक शेडवर कारवाई झाली नाही.

आगीची तीव्रता भीषण होती व आजूबाजूला रहिवासी असल्याने चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा धोका टळला. या घटनेत जखमी वा जीवितहानी झाली नाही.
- देवेंद्र पोटफोडे,
मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महापालिका


धायरी परिसरात बेकायदा कारखाने आणि शेडचे पेव फुटले आहे. मात्र, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने दुर्घटना घडत आहेत.
याबाबत आपले मत मांडा....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT