पुणे

उलगडला जोडप्यांचा सहजीवन प्रवास

CD

पुणे, ता.२२ : अनेक संकटे असून इतरांनाही सोबत घेऊन पुढे जाण्याचा ध्यास, जीवघेण्या संकटातून बाहेर पडलेल्या आपल्या माणसाला ताकदीने उभं करण्याची जिद्द, स्वत:च्या मुलांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी, अशा संकटावर मात करून सामाजिक कार्यातून पुढे जाण्याचा वसा निर्माण केलेल्या तीन जोडप्यांचा सहजीवनाचा प्रवास उलगडला
हिंदू महिला सभा आयोजित ‘समर्पित आदर्श सहजीवन’ कार्यक्रमात. शुक्रवारी (ता.२१) एसएम जोशी सभागृह, नवी पेठ येथे हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मुलाखतीच्या माध्यमातून नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकल चॅलेंजेस (एनएडब्लूपीसी) संस्थेचे संस्थापक डॉ. राहुल व पत्नी देवता देशमुख, ‘आपलं घर’ संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर व त्यांच्या पत्नी साधना फळणीकर आणि सूर्या जीमचे संस्थापक आणि व्यायामतज्ज्ञ डॉ. अरुण दातार व त्यांच्या पत्नी डॉ. आरती दातार या जोडप्यांचा सहजीवनाचा प्रवास उलगडला. यावेळी सोल्जर्स इंडिपेन्डन्ट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन(सिर्फ)संस्थेच्या सुमेधा चिथडे यांनी या जोडप्यांशी संवाद साधत त्यांचे नाते, प्रेम, जिद्द, त्याग, संघर्ष, समर्पण आणि त्या पलीकडचे सहजीवन आदी विषयांवर गप्पा मारल्या.
याप्रसंगी हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले, अभिनेते भरत जाधव, प्रतिभा शाहू मोडक आदी मान्यवर उपस्थित होते. सुप्रिया दामले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता नातू यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Awade : माजी मंत्री प्रकाश आवाडेंच्या मनातलं ओठावर आलं, खासदारकी लढवण्याचे दिले संकेत; आवाडे म्हणाले...

Sharad Pawar : ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Yashasvi Jaiswal : 'जर कोणी हद्द पार करत असेल, तर...', हर्षा भोगलेंच्या व्हिडिओवर जैस्वालची तिखट कमेंट; नेमकं काय घडलंय?

Marathi News Live Updates : यवतमाळमध्ये रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वणी बांधकाम विभागात नागरिकांचे ठिय्या आंदोलन

Mumbai Ganeshotsav: 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ला अदाणींची साथ, जाहिरातीसाठी प्रायोजक म्हणून मंडळासोबत करार

SCROLL FOR NEXT