पुणे

थंडीचा कडाका पुन्हा वाढणार

CD

पुणे, ता. ४ : शहरात पुन्हा गारठा वाढू लागला आहे. रविवारी (ता. ५) शहर व परिसरात थंडी कायम राहणार असून सकाळी धुके पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. शनिवारी (ता. ४) शहरात १०.३ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. सरासरीपेक्षा तापमानात घट असल्याने गारठा ही जाणवत होता.

शहरातील किमान तापमान गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. तर सरासरीपेक्षा तापमानात घट असल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे. रात्री आणि पहाटे गारठा आणि धुक्याची तर, दिवस उन्हाच्या चटक्यांची अनुभूती नागरिकांना होत आहे. दरम्यान पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात थंडीत काहीशी चढउतार होऊ शकते. मात्र, आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर किमान तापमानात ही घट आणि वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी परतल्याने शनिवारी (ता. ४) राज्यातील नीचांकी तापमान जळगाव येथे ७.७ अंश सल्सिअस इतके नोंदले गेले. जळगावसह, नागपूर, धुळे, औरंगाबाद आणि निफाड येथे पारा १० अशांच्या खाली होता. येथे थंडीच्या लाटेसारखी स्थिती आहे. दरम्यान सोमवारपासून (ता. ६) राज्यातील तापमानात पुन्हा चढ-उतार होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि माराठवाडा येथील बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांनी तर, विदर्भात २ ते ५ अंशांनी घट झाली आहे. ही स्थिती रविवारपर्यंत (ता. ५) अशीच कायम राहणार आहे.

येथे पारा कमी (आकडेवारी सेल्सिअसमध्ये) -
जळगाव - ७.७
पुणे - १०.३
औरंगाबाद - ९.१
नागपूर - ९.४
धुळे - ८.०
निफाड - ८.२
गोंदिया - १०.६
यवतमाळ - १०.७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT