पुणे

क्षेपणास्त्रे बसविण्यासाठी स्वदेशी प्रणाली

CD

बंगळूर, ता. १७ : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात असलेल्या वेगवेगळ्या लढाऊ विमानांना आता शस्त्रास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे बसविण्यासाठी देशात प्रथमच स्वदेशी प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. पुण्याच्या दिघी येथील संशोधन आणि विकास आस्थापना (अभियांत्रिकी-आर अँड डीई) यांनी ही कामगिरी केली आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची पुण्यातील आर अँड डीई या प्रयोगशाळेद्वारे स्वदेशी तंत्रज्ञानावर ‘आधारित एअरक्राफ्ट स्टोर रिलीज अँड इजेक्षण मेकॅनिझम’ ही प्रणाली (एएसआरईएम) विकसित केली आहे. हे एका प्रकारचे शस्त्र ‘लाँचर’ आहे. पहिल्यांदाच या प्रणालीला एरो इंडियामध्ये प्रदर्शनास ठेवण्यात आले.
याबाबत आर अँड डीईचे पारस राम यांनी सांगितले, ‘‘हवाई दलाच्या विमानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्रे बसविण्यासाठी ‘स्टोअर’चा वापर केला जातो. ज्यात शस्त्रास्त्रे बसविले जातात आणि आवश्यक तेव्हा त्यातून शस्त्रे हल्ला करण्यास सोडले जातात. आतापर्यंत या प्रणालीला आयात केले जात होते. मात्र देशात प्रथमच याची निर्मिती करण्यात आली आहे. विमानांच्या वजनानुसार या एएसआरईएमचे प्रकार असतात. त्यानुसार आर अँड डी ई ने १० किलोग्रॅम आणि ३० किलोग्रॅम इतक्या वजनाच्या दोन प्रकार तयार केले आहेत.’’

उत्पादन आणि पुरवठा
पुण्यातील स्टर्लिंग टेक्नो सिस्टम आणि बंगळूरचे ब्ल्यू हेड सोल्युशन प्रा. लि. या दोन उद्योग भागीदारांसह या प्रणालीचे उत्पादन करण्यात आले. हवाई दल आणि नौदल यांच्याकडे लढाऊ विमान असल्याने त्यांच्यासाठी या प्रणालीचे उत्पादन केले जात आहे. दरम्यान, या दोन्ही प्रकारच्या ‘एएसआरईएम’च्या मिळून ३० ऑर्डर देण्यात आल्या असून त्यांच्या उत्पादनाची प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी कळविले.


एएसआरईएम बाबत
- वजनाने हलके मात्र पेलोड क्षमता अधिक
- १० किलोग्रॅमचे एएसआरईएम ५०० किलोचे स्फोटक वाहून नेण्याची क्षमता
- तसेच हे सुखोई, मिराज, जग्वार, एलसीए तेजस या विमानांसाठी
- दरम्यान ३० किलोग्रॅमच्या एएसआरएमईमध्ये १००० किलो स्फोटक वाहून नेण्याची क्षमता
- तसेच याचा वापर मिग २९ साठी
- भारतात पहिली आणि एकमेव प्रणाली
- उच्च दाब न्यूमॅटिक तंत्रज्ञानावर आधारित
- याला विशेष देखभालीची आवश्यकता नाही
- विमान जमिनीवर असेल तेव्हा सुरक्षिततेसाठी ‘ग्राउंड सेफ्टी पिन सुविधा’


अशी होती पूर्ण प्रक्रिया
- याच्या डिझाईनसाठी दीड वर्षांचा कालावधी
- याच्या यशस्वी चाचणीसाठी दोन वर्षे लागली
- देशभरात उपलब्ध असलेल्या सर्व चाचणी केंद्रात याची २०० हून अधिक वेळा चाचणी पडली पार
- ही यंत्रणा आता विमानावर बसविण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र ही प्राप्त
- सध्या दोन्ही प्रकारांचे प्रत्येकी १० युनिट तयार असून लवकरच यांना हवाई दलाला दिले जाणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT