पुणे

धोरण निर्मात्यांची एक फळी निर्माण होईल

CD

यिन बातमी, लोगोसह वापरावी

नवी दिल्ली, ता. २४ : राजकीय नेतृत्व केवळ लोकप्रिय असून चालत नाही. तर त्याला देशाच्या धोरण निर्मितीची नस कळायला हवी. यासाठी ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ एक महत्त्वाचे व्यासपीठ असून, दिल्लीत केंद्रीय अधिवेशनातून असे नेतृत्व नक्की उदयास येईल, असा विश्वास राजकीय धुरिणांनी व्यक्त केला आहे.

‘सकाळ ’माध्यम समूहाच्या ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’चे (यिन) केंद्रीय अधिवेशन नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मंगळवारी (ता. २५) आणि बुधवारी (ता. २६) आयोजित करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांतील नेतृत्वाने असा विश्वास व्यक्त केला आहे. अधिवेशनाचे उद्‍घाटन मंगळवारी माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार नवीन कुमार आणि अशोक वानखेडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यिनच्या १० समित्यांचे राज्यभरातील प्रतिनिधी दिल्लीतील केंद्रीय अधिवेशनात सहभागी होतील.

अधिवेशनामध्ये नितीन सरकटे आणि हंसराज यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. सरकटे म्हणाले, ‘‘देशभक्तीपर गीतांबरोबरच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा कार्यक्रम दिल्लीत सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. यिनच्या अधिवेशनात ते ही महाराष्ट्र सदनात सादरीकरणाची संधी मला मिळत आहे.’’

यिनच्या माध्यमातून आजची तरुण पिढी देशाचे राजकारण, समाजकारण समजून घेत आहे. या तरुणाईला सामाजिक विषयांची, समस्यांची जाणीव या माध्यमातून होत असल्याने त्यांच्या ज्ञानाच्या आणि आकलनाच्या कक्षा रुंदावत आहेत. यामुळे आत्मभान असणारी सजग युवा पिढी घडवली जात आहे.
- राहुल शेवाळे, शिवसेना लोकसभा गटनेते, खासदार (दक्षिण - मध्य मुंबई)

यिनच्या प्रती संसद तथा प्रती विधानसभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांतील नेतृत्वगुणांना पुढे आणण्याचे काम सकाळ माध्यम समूह करत आहे. आगामी काळातील देशाच्या उज्ज्वल वाटचालीसाठी यिनने तयार केलेली वैचारिक फळी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- प्रताप पाटील चिखलीकर, खासदार, नांदेड लोकसभा

गेली नऊ वर्षे यिनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर महाविद्यालयीन विद्यार्थी विविध क्षेत्रात व स्तरावर काम करीत आहेत. यिनने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा उपयोग समाजासाठी तसेच देशाच्या उन्नतीसाठी होत आहे. यिनच्या या केंद्रीय अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील कामकाज समजण्यास नक्कीच मदत होईल.
- किरण साळी, युवासेना सचिव, महाराष्ट्र राज्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT