पुणे

चंदननगरला भरदिवसा सराफी पेढीत लूट

CD

पुणे, ता. ८ : चंदननगर भागातील साईनाथनगर भागात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सराफी पेढीच्या मालकाला धमकावून तीन ग्रॅम सोन्याचा ऐवज पळवून नेल्याची घटना घडली.
चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथनगर भागात आशापुरी ज्वेलर्स सराफी पेढी आहे. दुचाकीवरून आलेले चोरटे शुक्रवारी एकच्या सुमारास सराफी पेढीत शिरले. त्यांचे चेहरे रुमालाने झाकले होते. त्यांनी मालकाला शस्त्राचा धाक दाखवला व पेढीतील तीन ग्रॅमच्या सोन्याच्या बाळ्या घेऊन धूम ठोकली. याबाबत सराफी पेढीच्या मालकाने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी फिर्यादीने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला व आरडाओरडा केला. तसेच त्यांच्या अंगावरही स्टूल फेकून मारला. मात्र, चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरून पसार झाले. फिर्यादी यांचा आरडाओरडा ऐकून नागरिकांनी सराफी पेढीत धाव घेतली व चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु ते वेगाने निघून गेले.
विशेष म्हणजे चंदननगर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन पद्धतीने शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात केले. त्यानंतरच ही घटना घडली. चंदननगर भागातील साईनाथनगर परिसर गजबजलेला असून तो खराडी बाह्यवळण मार्गाजवळ आहे. पोलिस साईनाथनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्यांचा माग काढत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Killed Hamas Commanders : इस्रायली सैन्याने घेतला ७ ऑक्टोबरचा बदला; हमास दहशतवादी संघटनेच्या टॉपच्या पाच कमांडर्सचा केला खात्मा!

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम!, जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Pune Crime: साडेचार वर्षांनंतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता, पुण्यातील 'ते' प्रकरण पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं?

PM Modi and Vladimir Putin: पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना केला फोन अन् 'या' मुद्य्यावर झाली चर्चा!

Chandrashekhar Bawankule : राज्यातील 45 लाख शेतकऱ्याना पुढील पाच वर्ष शेतातील विजपंपाचे बील भरावे लागणार नाही

SCROLL FOR NEXT