पुणे, ता. १३ : दिवाळीच्या निमित्ताने महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे महिलांनी बनविलेल्या विविध वस्तूंचे ‘बचत बाजार व विक्री प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन शहराच्या वेगवेगळ्या भागांत ६ ठिकाणी भरविले आहे.
महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या महिलांच्या बचत गटांना उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी दरवर्षी दिवाळीनिमित्त विविध ठिकाणी बचत बाजार व विक्री प्रदर्शन भरविले जाते. त्यानुसार यंदा वडगाव शेरी येथील नवीन भाजी मंडई, सिंहगड रस्त्यावर पु. ल. देशपांडे उद्यान, कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजजवळील नथुजी मेंगडे जलतरण तलाव, कात्रज येथील कात्रज दूध डेअरी, कोथरूडमधील वनाज मेट्रो स्थानकाजवळील जीत मैदान आणि खराडीतील झेन्सॉर आयटी पार्क कंपनी मैदान येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत भरविले आहे.
प्रदर्शनात दिवाळी फराळ, विविध प्रकारचे घरगुती मसाले, लोणचे, पापड, आकाशकंदील, शेवया, कुरड्या याबरोबरच शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत. स्वेटर्स, तयार कपडे, तोरण, आयुर्वेदिक उत्पादने, रांगोळी, कापडी पिशव्या, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्तीसह घरगुती वापरातील विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. नागरिकांनी या प्रदर्शनात विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद घेऊन बचत गटातील महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त जयंत भोसेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.