पुणे

आदिवासी संस्कृती माणसांमधील अंतर कमी करणारी

CD

भीमाशंकर, ता. २८ : ‘‘आदिवासी संस्कृतीमुळे भारताची जगाला ओळख झाली. ही संस्कृती माणसामाणसामधील अंतर कमी करते. आदिवासी संस्कृती ही जगातील सर्वात पुरातन संस्कृती आहे.’’ असे मत सुप्रसिद्ध लेखिका उषाकिरण अत्राम यांनी व्यक्त केले. ते पोखरी (ता. आंबेगाव) येथील श्री पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित आदिवासी जीवन संघर्ष आणि शाश्‍वत विकास या विषयावरील आंतर विद्या शाखीय राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कोळप हे होते. अत्राम म्हणाले, ‘‘जल, जंगल, जमीन टिकली तरच आदिवासी संस्कृती टिकेल आणि आदिवासी समाजाचा शाश्‍वत विकास होईल.’’ राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषक डॉ. कैलास बवले म्हणाले, ‘‘आदिवासी समाजाचा शाश्‍वत विकास घडवून आणावयाचा असेल तर आदिवासी संस्कृती व संवर्धन होणे काळाची गरज आहे.’’
या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखिका कुसुम अलाम यांनी आदिवासी समाजावर होणारे अन्याय, अत्याचार थांबले पाहिजेत असे नमुद केले. तर फर्ग्युसन महाविद्यालय पुणे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेखा घारे यांनी ही आदिवासी शाश्‍वत विकासासाठी सर्वोत्तम प्रयत्न होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय चर्चासत्रात पाबळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय घोडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. संदीप चपटे, डॉ. शशिकांत साळवे यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन आरुश्री पब्लिकेशन सासवडच्या प्रा. पायल जगताप यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी प्रा. डॉ. कृष्णा भवारी, डॉ. प्रल्हाद शिंदे, प्रा. रूपनारायण, डॉ. दिलीप कदम, डॉ. विक्रम जाधव, प्रा. स्वप्निल जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव सीताराम जोशी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. प्रशीक साळवे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. उज्ज्वला गगे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे तुम्हाला माहित्येय का? सचिन तेंडुलकर, वसिम अक्रम एकाच संघाकडून श्रीलंकेविरुद्ध खेळले होते; India-Pakistan यांचा मिश्र संघ उतरलेला मैदानावर अन्..

RBI Rule: वसुली एजंट्सचे कर्जदाराशी गैरवर्तन सहन केले जाणार नाही; बँका आणि एजंटना इशारा, RBI कडून नवे नियम जारी

IND vs PAK : तो अपयशी होण्याची शक्यता अधिक आहे! पाकिस्तानी खेळाडू अभिषेक शर्माला म्हणाला, slogger...; केला अपमान

Latest Marathi News Live Update : शिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये तयारी अंतिम टप्प्यात

Mumbai Pune Expressway traffic update: सुट्टीचा प्लॅन बिघडला! विकेंडच्या सुरुवातीलाच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT