पुणे

‘मुसाफिर’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आज आयोजन

CD

पुणे, ता. ३ ः भारतीय संगीतातील अस्पर्शित पैलूंचे दर्शन घडविणाऱ्या ‘मुसाफिर’ या आगळ्यावेगळ्या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन ‘वेध, पुणे’ आणि ‘वेध कट्टा, पुणे’ यांच्यातर्फे केले आहे. शनिवारी (ता. ४) सायंकाळी ६ वाजता मयूर कॉलनीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल.
भारतीय राग संगीत शिकण्यासाठी हजारो मैलांचे अंतर पार करून येणाऱ्या परदेशी कलाकारांचे अनुभव या कार्यक्रमात टिपण्यात आले असून भारतीय संगीतातील गुरू-शिष्य परंपरेचाही वेध घेण्यात आला आहे. दीड तास कालावधीच्या या कार्यक्रमात अभिवाचनासह काही दुर्मिळ ध्वनीचित्रफितींचाही समावेश आहे. या कार्यक्रमाचे संशोधन व संहिता वंदना अत्रे यांची असून अभिवाचन वंदना अत्रे व डॉ. चंद्रकांत संकलेचा हे करणार आहेत. रसिकांना या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असून त्यांनी अधिकाधिक संख्येने या अनोख्या प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

SCROLL FOR NEXT