पुणे

मिळकत करापोटी महापालिकेच्या तिजोरीत १६०० कोटींची भर

CD

पुणे, ता. ७ ः महापालिकेच्या तिजोरीमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तब्बल १६०० कोटी रुपये जमा झाले आहेत. तर मार्च अखेरपर्यंत दोन हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्‍यता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केली आहे.

पुणे महापालिकेस मिळकत कर, स्थानिक स्वराज्य संस्था कर व बांधकाम विभाग अशा विभागांमधून सर्वाधिक उत्पन्न प्राप्त होते. यावर्षी मिळकत करासाठी कोणत्याही प्रकारची सवलत महापालिकेकडून देण्यात आली नव्हती. त्यानंतरही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मिळकत करापोटी तब्बल १६०० कोटी रुपये इतकी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. १५ जानेवारीपर्यंत ही रक्कम एक हजार कोटीपर्यंत पोचली होती, त्यानंतर त्यामध्ये चांगलीच वाढ होऊन ६ फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम १६०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. याविषयी महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘महापालिकेने मिळकत करासाठी कोणत्याही प्रकारची सवलत दिली नव्हती. त्यानंतरही आत्तापर्यंत १६०० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. अजून दीड ते दोन महिने शिल्लक आहेत, तोपर्यंत महापालिकेने मिळकत करासाठी ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT