Kasba Bypoll Election
Kasba Bypoll Election esakal
पुणे

Kasba Bypoll Election : कसब्याचा गड ढासळतो तेव्हा...!

- संभाजी पाटील @psambhajisakal

पराभव समोर दिसू लागला, की हिंदुत्वाच्या भावनिक मुद्द्याला हात घालायचा, हा भाजपचा प्रयोग पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात यशस्वी झाला नाही.

- संभाजी पाटील

पराभव समोर दिसू लागला, की हिंदुत्वाच्या भावनिक मुद्द्याला हात घालायचा, हा भाजपचा प्रयोग पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात यशस्वी झाला नाही. उमेदवार ताकदीचा असेल आणि सर्व घटकपक्षांनी मनापासून काम केले, तर भाजपचा पराभव होऊ शकतो, हा मोठा आत्मविश्वास देणारी ही पोटनिवडणूक ठरली. पुण्यात पुन्हा एकदा काँग्रेस जिवंत करण्याचे काम या निकालाने केले असून, येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला मोठा इशारा देणारा हा निकाल ठरला आहे.

‘Who is Dhandekar’ हे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उच्चारलेले वाक्य प्रचारासाठी ठीक असले तरी धंगेकर यांना पहिल्या दिवसापासून मिळालेला प्रतिसाद भाजपला अस्वस्थ करणारा ठरला. याच कारणामुळे अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे डझनभर मंत्री सर्व ताकदीनिशी प्रचारात उतरले होते.

पण या वेळी मतदारांनी निर्णय घेतला होता. एक काम करणारा सामान्य उमेदवार विरुद्ध सर्व प्रकारची ताकद असणारे सत्ताधारी असेच या लढतीचे चित्र राहिले. हे ‘परसेप्शन’ बदलण्याऐवजी ते अधिक घट्ट करण्याचे काम भाजपच्या काही कृतींतून झाले. निवडणूक म्हटले की पैशाचा धूर असेच वातावरण राजकीय पक्ष तयार करतात. धंगेकर यांनी नेमका हाच मुद्दा कॅच करत आपली लढाई धनशक्ती विरोधात असल्याचा मुद्दा सतत पेटवत ठेवला. हा मुद्दा भाजपला शेवटपर्यंत नीट खोडता आला नाही.

धंगेकर विरुद्ध भाजप अशीच लढत
काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची ही तिसरी निवडणूक. २००९ मध्ये धंगेकर यांचा गिरीश बापट यांच्याकडून अवघ्या आठ हजारांनी पराभव झाला होता. २०१४ मध्ये मनसेत असताना धंगेकर तिसऱ्या स्थानावर होते.

त्यानंतर धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये धंगेकर यांच्याऐवजी अरविंद शिंदे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. मात्र तेव्हा काँग्रेसचा मोठा पराभव झाला. धंगेकर यांनी मात्र नगरसेवक म्हणून आपले काम नेटाने केले. कोरोनाकाळात त्यांनी केलेली मदत, तसेच सर्वसामान्यांसाठी रात्री हाक दिली तरी मदतीला धावून येणारा कार्यकर्ता अशी त्यांची इमेज यामुळे त्यांच्याविषयी पहिल्या दिवसापासून सहानुभूती राहिली.

सदाशिव, शनिवार, नारायण या भाजपच्या कट्टर समजल्या जाणाऱ्या प्रभागांमध्ये हेमंत रासने यांना केवळ सात हजार मतांचीच आघाडी मिळाली, तेथेच धंगेकरांचा विजय झाला. धंगेकर यांना आघाडीतील तीनही पक्षांचे बळ मिळाले ही वस्तुस्थिती असली तरी धंगेकर यांचे स्वतःचे असे कार्यकर्त्यांचे मोहोळ होते. प्रचारात ते वेळोवेळी जाणवले. धंगेकर यांच्यामुळे काँग्रेसला कधी नव्हे एवढे बळ आले, भाजपला मात्र स्वतःविषयीचा फाजील आत्मविश्वास नडला. एवढी मोठी यंत्रणा, नगरसेवक, पक्ष संघटनेचे विस्तृत जाळे, संघाची शिस्तबद्ध यंत्रणा असताना भाजप मतदारसंघात विजयाचे वातावरण तयार करू शकली नाही.

भाजपविरोधातील राग
कसब्याच्या विजयात एक बाब सर्वांत महत्त्वाची ठरली ती म्हणजे महाविकास आघाडीतील एकजूट. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेल्याने मूळ शिवसैनिकांमध्ये असंतोष होता. त्यांना भाजपला धडा शिकवायचा होता.

कसब्यात मूळ शिवसैनिकांची ताकद आहे. आदित्य ठाकरे यांची रॅली आणि सभेला जो प्रतिसाद मिळाला, त्यावरूनच डिवचलेला शिवसैनिक कामाला लागल्याचे स्पष्ट झाले. या पक्षाचे कार्यकर्ते जोमाने धंगेकर यांच्या प्रचारात उतरले. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रामाणिकपणे काम करीत धंगेकर यांना साथ दिली.

अजित पवार आणि स्वतः शरद पवार यांच्या सभा धंगेकरांच्या विजयाचा पाया रचत गेल्या. आतापर्यंत २००९ पासूनच्या निवडणुकीत कसब्यात भाजपला मतविभागणीचा फायदा झाला आहे. २००९ आणि २०१४ मध्ये धंगेकर आणि रोहित टिळक यांच्यात झालेल्या मतविभागणीत बापट विजयी झाले. २०१९ मध्येही मतविभागणीचा फायदा भाजपला झाला होता.

या पोटनिवडणुकीत थेट लढत झाली आणि भाजपचा पराभव झाला. महाविकास आघाडी एकत्र राहिली तर भाजपचा पराभव करु शकतो हा संदेश मिळाला. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधातील हा प्रयोग राबविला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT