पुणे

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास अटक

CD

पुणे, ता. ४ ः तरुणीशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तरुणास अटक केली आहे. त्यास सोमवारपर्यंत (ता.६) पोलिस कोठडी सुनावली आहे.
ऋजित राजेंद्र डोके (वय २८, रा.आळे, जुन्नर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये घडला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व ऋजित डोके हे २०१२ पासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तरुणाने फिर्यादी तरुणीशी ओळख वाढविली. त्यानंतर त्याने तरुणीला प्रेमाची मागणी घातली, मात्र तरुणीने त्यास नकार दिला. दरम्यान, त्याने तरुणीस त्याच्या गाडीवर बसवून निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने तरुणीवर प्रेम करीत असल्याचे व तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगून तिच्यावर बलात्कार केला. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. भितीपोटी तरुणीने हा प्रकार घरी सांगितला नाही. त्यानंतरही त्याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने त्याच्याकडे लग्न करण्यासाठी पाठपुरावा केला, मात्र त्याने लग्नाला नकार देऊन तरुणीस तिच्या घरी जाऊन मारहाण केली. या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर डोके यास करण्यात आली. न्यायालयाने त्यास ६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT