पुणे

खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान नवीन कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण

CD

पुणे, ता. ७ : खडकवासला ते इंदापूरपर्यंतच्या नवीन मुठा उजवा कालव्याच्या दुरूस्ती कामांसाठी आतापर्यंत ३५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. विशेषत: फुरसुंगी, खडकवासला, जनता वसाहत ते शिंदेवस्तीपर्यंतच्या भागाचा त्यात समावेश आहे. या उपाययोजनांमुळे गळती कमी होऊन कालव्याची वहन क्षमता वाढल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे.

खडकवासला ते इंदापूरपर्यंत २०२ किलोमीटर लांबीचा कालवा आहे. १९६० म्हणजे ६३ वर्षांपूर्वी या कालव्याचे काम पूर्ण झाले. खडकवासला ते फुरसुंगीपर्यत या २९ किलोमीटर दरम्यानच्या कालव्यामध्ये पुणे शहरातील धायरी, नांदेड, जनता वसाहत, लष्कर छावणी भाग, हडपसर यासह फुरसुंगी जातो. तर पुढे लोणीकाळभोर दौंड आणि शेवटी इंदापूरला जाऊन पोहचतो. २०१८ मध्ये दांडेकर पूल परिसरात हा कालवा फुटला होता. तेव्हापासून दरवर्षी या कालव्याची पाहणी करून देखभाल-दुरुस्ती केली जाते. या कालव्याच्या शहरी भागात अजूनही ४० टक्के पाणी गळती होत होती. कालव्याखालून पाण्याची गळती होत असल्यामुळे इंदापूरपर्यंत कमी पाणी पोहचते. गळतीमुळे कालवा फुटण्यासारख्या घटना होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण आणि मजबुतीकरणाची कामे सुरू करण्यात आली होती. त्यासाठी ३७ कोटींचा निधी मंजूर आहे. त्यापैकी ३५ कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत.

कालव्याच्या भरावाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. फुरसुंगी येथील देशमुख मळा तसेच खडकवासला, धायरी, जनता वसाहत ते शिंदेवस्तीपर्यत भागापर्यंत कालव्याच्या दुरूस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. या कामासाठी सुमारे ३७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ३५ कोटींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT