पुणे

आम्ही पुढं जायचं नाही का? अंगणवाडी सेविकांचा उपायुक्तांना उद्विग्न सवाल

CD

पुणे, ता. ९ : घरची आर्थिक स्थिती बेताची त्यामुळे जास्त शिकता आले नाही. कसेबसे दहावी उत्तीर्ण झालो. अंगणवाडी सेविका होता येईल असं आश्वासन मिळालं. सेविकेच्या जागा रिक्त नव्हत्या म्हणून गप्प बसावं लागलं. आता जागा निघाल्यात तर शिक्षणाची अट बारावी करण्यात आली. आता तुम्हीच सांगा आम्ही पुढं जायचं नाही का? आम्ही प्रगती करायची नाही का? असा उद्विग्न सवाल अंगणवाडी सेविकांचा उपायुक्तांना विचारला.

जागतिक महिला दिनी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने बुधवारी दुपारी समाजकल्याण कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली अनवाणी मोर्चा काढण्यात आला. यात सहभागी महिलांची संख्या अधिक होती. जिल्हाधिकारी कार्यालय ते समाजकल्याण कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी मदतनीस, सेविकांनी एक दिवसीय उपोषण केले. यात विधवा, परित्यक्ता, प्रौढ कुमारिका, घटस्फोटित अशा एकल महिलांचे अधिक प्रमाण होते. या वेळी वैशाली बनसोडे, सुनीता जाधव, मनीषा गाडे, विद्या कडू, रेखा गायकवाड, अनिता आवळे, शकुंतला घोरपडे, सुनंदा साळवे, शैलजा चौधरी आदी उपस्थित होत्या. या वेळी विभागीय उपायुक्त संजय माने यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

या आहेत मागण्या
अंगणवाडी मदतनिसांना पदोन्नती देत असताना पूर्वीची दहावीच्या शिक्षणाची अट कायम ठेवावी, आताची बारावी उत्तीर्णची अट रद्द करण्यात यावी. तसेच त्यांची सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य सेविकापदी नियुक्ती करण्यात यावी. दहावी उत्तीर्ण झालेल्या अंगणवाडी सेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य सेविकापदी नियुक्त करावे. त्यासाठी वय व शिक्षणाची अतिरिक्त अट घालू नये.

शासनाने सेविकांच्या जागा रिक्त असताना अनेक मदतनिसांना सेविकेचे काम करायला लावले. ते काम त्यांनी सक्षमपणे केले. मात्र सेविकापदी नेमणुकीची वेळ आल्यानंतर शैक्षणिक अर्हतेत बदल करून मदतनीसांचा विश्वासघात केला. शिक्षणाची व वयाची अतिरिक्त अट घालून सरकारने शंभर टक्के महिलांचा समावेश असलेल्या या घटकावर अन्याय केला आहे. या अन्यायाविरुद्ध संघटना लढेल.
- नितीन पवार, अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT